Vetan Niwaran Samiti : सातव्या वेतन आयोगातील त्रुटी निवारण करण्यासंदर्भात विविध रिटयाचीका दाखल करण्यात आल्या होत्या.
सदरील न्यायालयात दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्याबाबत शिफारशी करण्याकरीता महाराष्ट्र शासनाकडून दिनांक १६.०३.२०२४ शासन निर्णयान्वये वेतनत्रुटी निवारण समिती, २०२४ ची स्थापना करण्यात आली होती.
Vetan Niwaran Samiti Maharashtra
सातव्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी सहायक कक्ष अधिकारी व लिपिक-टंकलेखक यांच्या सेवा अधिग्रहीत करणेबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन आदेश दिनांक:- २३ एप्रिल,२०२४ रोजी निर्गमित करण्यात आला होता.
सदरील वेतन त्रुटी निवारण समितीस स्थापनेच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या शासनास अहवाल सादर करण्याचे सुचित करण्यात आले होते. वेतन त्रुटी निवारण समिती, २०२४ च्या कामकाजासाठी खालील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.
- श्रीमती अश्विनी मोहन लांभाते (सहायक कक्ष अधिकारी)
- श्री. प्रदिप दिगंबर रेडकर
- श्री. निखिल सं. रोकडे (सहायक कक्ष अधिकारी लिपिक-टंकलेखक)
वेतन त्रुटी निवारण समितीस मुदतवाढ
सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेतील वेतनत्रुटींचे निवारण करण्याकरिता वरील १) येथील आदेशान्वये वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली होती.
मित्रांनो, या समितीला अहवाल सादर करण्यासाठी दि.३०.११.२०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती.समितीस अहवाल सादर करण्यासाठी दिलेली मुदत आता संपली असून,समितीचे कामकाज अद्याप बाकी आहे. त्यामुळे उर्वरित कामकाज पुर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सुधारित वेतन संरचनेतील वेतनत्रुटींचे निवारण करण्याकरिता नियुक्त केलेल्या वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ला आपला अहवाल सादर करण्यासाठी दि. ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.