UPS New update : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजने (Unified pension scheme) मध्ये सहभागी होण्यासाठी दि.३१.०३.२०२५ पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना शासन निर्णयान्वये देण्यात आल्या होत्या.
UPS Pension Scheme New Update
मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की नुकतेच सरकारने एमपीएससी मध्ये सुधारणा करून नवीन यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन योजना लागू केली आहे. केंद्र सरकारने दिनांक 1 एप्रिल 2025 पासून या योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात राजपत्र नुकतंच जाहीर केले होते.
महाराष्ट्रात सुद्धा UPS प्रणाली लागू करण्यात येणार अशी घोषणा सरकारला केली होती, परंतु याबाबत कोणतीही अधिसूचना केव्हा मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आलेला असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
NPS किंवा UPS पैकी कोणता कोणता विकल्प निवडावा या संदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये मोठी शासकता निर्माण झाली होती आता राज्य सरकारकडून अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना विकल्प निवडण्यासाठी मोठा कालावधी किंवा वेळ मिळणार आहे.
एकीकृत निवृत्तिवेतन योजना विकल्प मुदतवाढ
मित्रांनो,केंद्र सरकारने दि.२४.०८.२०२४ रोजी ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ (Unified Pension Scheme) शासकीय कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी लागू करण्यास मान्यता दिलेली आली आहे.
“राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली” म्हणजेच NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS या दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यास मुभा राहणार आहे.
राज्य शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यावयाचा एक वेळचा (One Time Option) विकल्प देण्यासाठी 31 मार्च 2025 हा दिनांक देण्यात आला होता. सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी 1 वर्ष म्हणजेच दि. 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.