UPI Payment : गुगल पे, फोन पे, पेटीएमसारखे यूपीआय वापरत असाल तर; लक्षात ठेवा या 5 नव्या गोष्टी … …

UPI Payment : मित्रांनो आपल्याला माहिती असेल की एक जानेवारी 2024 पासून RBI ने UPI Payment संदर्भात नवीन नियमावली लागू केली आहे. ग्राहकांच्या संदर्भात पाच नवीन नियम करण्यात आलेले आहेत, यूपीआय व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी पाच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

UPI Payment new rules

Inactive UPI ID :- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) बँकांना सांगितलेले आहे की एका वर्षामध्ये किंवा एका वर्षापेक्षा जास्त काळ वापरात नसलेले फोन पे, गुगल पे, पेटीएम असे आयडी बंद करून टाकावेत.

थोडक्यात 12 महिने एखाद्या आयडीवरून व्यवहार झाले नसतील तर तो आयडी बंद होईल. NPCI ने सदरील नियम अन्यामागचे कारण अशा अशा यूपीआय आयडीवरून फ्रॉड होण्याशी शक्यता असते.

Transfer limits : RBI ने जाहीर केले आहे की, ते यूपीआय व्यवहारांची मर्यादा काही ठराविक बाबतीत वाढवत आहेत. हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आता यूपीआयद्वारे 1 लाखाऐवजी 5 लाखांपर्यंत रक्कम पाठवता येणार आहे.

Transaction charges : आता 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर शुल्क आकारले जाणार आहे. ऑनलाइन वॉलेटसारख्या प्रीपेड पेमेंट साधनांचा वापर करून केलेल्या 2,000 रुपयांपेक्षा जास्त असलेल्या काही व्यापारी UPI व्यवहारांवर 1.1 % इंटरचेंज शुल्क देखील आकारले जाईल. मात्र सर्वसामान्य नागरिकांना हे लागू होत नाही.

UPI ATM :- RBI देशभरात UPI ATM सुरु करणार आहे. या एटीएममधून तुम्ही QR कोड स्कॅन करून थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता.नोव्हेंबर 2023 मध्ये UPI व्यवहारांचे मूल्य 17.4 ट्रिलियन रुपयांवर पोहोचले आहे, जे ऑक्टोबर 2023 मधील 17.16 ट्रिलियन रुपयांपेक्षा 1.4 टक्के अधिक आहे. तसेच, व्यवहारांची संख्या 1.5 टक्क्यांनी घसरून 11.24 अब्ज झाली आहे.

चुकून भलत्याच अकाऊंटला पैसे गेले तर?

मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन व्यवहारामुळे जशा सुविधा झालेला आहे. ऑनलाईन व्यवहार लक्षात घेता  NPCI ने ही नवीन नियमावली लागू केली आहे.

आता नव्या युझरला पैसे ट्रान्सफर करताना 2 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर, 4 तास वाट पाहावी लागेल.त्यामुळे जर भलत्याच अकाऊंटला रक्कम ट्रान्सफर झाली तर त्या 4 तासात ती परत मिळवता येईल.

Leave a Comment

error: Don't Copy!!