Upcoming Smartphone :- नमस्कार मित्रांनो,आता या महिन्यात भारतीय बाजारात 5 धमाकेदार स्मार्टफोन येणार आहेत.स्मार्टफोनमध्ये एकापेक्षा एक उत्तम फीचर्स असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदरील मोबाईल फोन विषयी सांगायचं झाल्यास कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत उत्कृष्ट ठरणार असल्याचे चर्चा सध्या सुरू आहे.
भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच या महिन्यात तुम्हाला 5 नवे स्मार्टफोन पाहायला मिळणार आहे.सर्व फोनवर चर्चा करताना आपल्याला Samsung Galaxy A36, Vivo V50,Realme P3 Pro, iQOO Neo 10,RASUS ROG Phone 9 या फोनची माहिती समोर येत आहे.आता हे स्मार्टफोनकधी लाँच होणार आणि त्याचे फीचर्स कसे असतील हे जाणून घेऊयात.
UpcomingSmartphone2025
Realme P3 Pro : मित्रांनो या फोनच्या लाँचबद्दल बोलायचे झाले तर या फोन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रियलमी पी 3 प्रो ची संभाव्य किंमत 10 ते 20 हजार रुपये असू शकते. आपल्याला 6.70 इंचाची डिस्प्ले मिळेल.Qualcomm Snapdragon 7s जनरेशन 2 चिपसेटने सुसज्ज आहे. 5200mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
iQOO Neo 10R :- सदरील स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपये असण्याची शक्यता असून फेब्रुवारीच्या मध्यात लाँच करण्यात येणार आहे. सदरील फोन Snapdragon 8s जनरेशन 3 चिपसेटने सुसज्ज असणार आहे. फोनमध्ये 144Hz AMOLED डिस्प्ले, दमदार कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो.
Vivo V50 सीरीज
मित्रांनो,वेळच्या या V50 सिरीज स्मार्टफोनची किंमत जवळपास 40 ते 50 हजार रुपये असणार आहे.Vivo V50 आणि V50 Pro प्रकारात हा स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाच्या डिस्प्लेसह, फोटो-वीडियोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा मिळू शकतो. Vivo V50 फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी असून 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy A36/ Galaxy A56
सॅमसंग आपल्या लोकप्रिय गॅलक्सी A सिरीजचे लॉन्च या महिन्यात करू शकते. सदरील सिरीजमध्ये स्मार्टफोन Galaxy A36 आणि Galaxy A56 समावेश असू शकतो.ग्राहकांच्या मागणीनुसार नवीन कॅमेरा आणि फीचर्स सादर करू शकते.
ASUS ROG Phone 9
मित्रांनो या मालिकेत ASUS ROG Phone 9 आणि ROG Phone 9 प्रो असे दोन स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. दोन्ही फोन फेब्रुवारीमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता असून Snapdragon 8 Elite चिपसेटने सुसज्ज आहे. ग्राहकांना फोनमध्ये 5800mAh ची बॅटरी मिळणार आहे.