Unified Pension Scheme : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की नुकताच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केलेली आहे काही दिवसापूर्वीच आठवावेत स्थापन करण्यात आलेला आहे.
Unified Pension Scheme – 8th Pay
मित्रांनो आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ रोजीपासून लागू होणार आहे.नवीन वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतनावर मोठा परिणाम होणार आहे.
आता नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन प्रणाली लागू करण्यात आली आहे. नव्या वेतन आयोगामुळे New Unified Pension Scheme न्यू यूनिफाइड पेन्शन योजनेवरही १ एप्रिल २०२५ पासून परिणाम होणार आहे.
8th pay commission मुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना लाभ होणार आहे.युनिफाईड पेन्शन स्कीम ही जुनी पेन्शन योजना (OPS) व नवीन राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे NPS अशा दोन्ही योजनेचा अभ्यास करून तयार करण्यात आली आहे. या योजनेमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना १२ महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाचा ५० % हिस्सा हा पेन्शनच्या रुपात मिळणार आहे.
युनिफाईड पेन्शन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान २५ वर्ष सेवा करणे आवश्यक असणार आहे. तर एखाद्या कर्मचाऱ्याने १० वर्षे सेवा केली. या व्यक्तीला किमान १० हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळणार आहे. तसेच कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शनचा ६० टक्के हिस्सा दिला जाणार आहे.
8th Pay commission Fitment Factor
आठव्या वेतन आयोगाची स्थापना ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे सदरील आयोगांतर पेन्शनमध्ये किमान २५% ते ३० % वाढ होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये किमान पेन्शनची रक्कम ९ हजार रुपये असून आता नवीन वेतन आयोगानुसार २२ ते २५ हजार रुपये पर्यंत ही रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फिटमेंट फॅक्टरमध्ये कशी वाढ होते, यावर वेतन आणि पेन्शनमध्येही वाढ होऊ शकते.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्क्यांनी वाढून २.८६ टक्के होऊ शकते.
सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनमध्ये किमान १८६ % नी वाढ पाहायला मिळू शकते. UPS नव्या योजनेअंतर्गत किमान १.२ कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सला फायदा होणार आहे.