Travel Insurance : नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार असून यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे प्रवास विमा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत विमा क्षेत्रातील अतिशय छोटा पण खूप महत्त्वाचा हा प्रकार असून ह्या विषयी बहुसंख्य लोकांना माहितीच नसते.
ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय?
कोविड-19 नंतर वेगवेगळ्या देशांनी विजा प्रक्रियेदरम्यान ट्रॅव्हल इन्शुरन्स अत्यावश्यक केलेला असून ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे एखादी व्यक्ती प्रवासासाठी बाहेर जाते तेव्हा त्या व्यक्तीला वेगवेगळे आवरण किंवा विमा कवच दिले जाते.
मित्रांनो ट्रॅव्हल इन्शुरन्स विषयी बोलायचं झाल्यास अमेरिकन डॉलर मान्यता प्राप्त असल्यामुळे ट्रॅव्हल इन्शुरन्स रक्कम डॉलर मध्ये पेड केली जाते.पण त्याचा हप्ता मात्र भारतीय चलनामध्ये रूपांतरित केला जातो.
प्रवासी हफ्ता हा प्रवास करणाऱ्या व्यक्तीचे वय, प्रवासाचे दिवस, त्यानंतर त्याला देण्यात आलेल्या सुविधा यावर अवलंबून असतात साधारणपणे कमीत कमी 50 हजार डॉलर पासून जास्तीत जास्त 10 लाख डॉलर्स पर्यंत विमा संरक्षण यामध्ये मिळत असते.
Type of travel insurance
इंरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स
भारताच्या बाहेर प्रवासासाठी जाणाऱ्यांना इंरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स दिला जातो. टुरिस्ट, व्यक्तीगत किंवा फॅमिली व्हिजिट अशा कोणत्याही व्हिसावर जाणाऱ्या व्यक्ती हा इन्शुरन्स घेऊ शकतात. हा इन्शुरन्स ती व्यक्ती विमानामध्ये बसल्यापासून ते पुन्हा मायदेशी परतण्यापर्यंत लागू असतो.
स्टुडेन्ट ट्रॅव्हल इन्शुरन्स
विदेशांमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थींचा प्रवासी विमा किंवा स्टुडेंट ओव्हरसिज हेल्थ इन्शुरन्स घेतला जातो. सदरील विमा मध्ये कोर्सचा पूर्ण कालावधीचा समावेश करता येतो.आरोग्यासोबतच अन्य अनेक सुविधांचा लाभ मिळतो.या इन्शुरन्सची जबाबदारी पालकांना घ्यावी लागते.
कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्शुरन्स
विविध कामांसाठी कंपनी जेव्हा त्यांच्या कर्मचाऱ्यांना परदेशी पाठवतात तेव्हा त्यांना कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्शुरन्स दिला जातो. यामध्ये कंपनीच्या फायद्याला अनुसरून काही कव्हर घेतले जातात.
डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्शुरन्स
देशात कोणत्याही ठिकाणी प्रवास करताना मुख्यत्वे हा इन्शुरन्स घेतात. बहुतांश करून कठीण ठिकाणी प्रवास करताना सध्या ह्या इन्शुरन्स घेतला जातो. बरेच वेळेस तिकीट काढताना हा इन्शुरन्स कव्हर केलेला असतो.