Traffic rules : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आता घरोघरी मोटरसायकल आलेले आहेत.आपण दैनंदिन जीवनात मोटरसायकलचा अनेक वेळा वापर करत असतो.
मोटरसायकल चालवताना कोणकोणत्या नियमांची काळजी घ्यावी ? नियमांचा भंग केल्यानंतर किती दंड पडेल याची सविस्तर माहिती आपल्याला नसते.आज आपण याविषयी सविस्तर लेख पाहणार आहोत.
मोटार वाहन कायद्यातील शिक्षा
- चारचाकी गाडी चालवताना सीटबेल्ट लावला नसल्यास दंड 1000 रूपये
- दुचाकी चालवताना हेल्मेट घातला नसल्यास दंड 1000 रूपये आणि तीन महिन्यांपर्यंत परवाना रद्द
- अॅम्ब्युलन्ससारख्या आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडवल्यास दंड 10 हजार रूपये किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास
- वाहन चालवताना परवाना नसेल तर दंड 5 हजार रूपये किंवा एक वर्षांची शिक्षा
- परवाना रद्द झाला असतानाही वाहन चालवल्यास दंड 10 हजार रूपये किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास
- भरधाव गाडी चालवल्यास दंड 5 हजार रूपये किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास
- अल्पवयीन व्यक्तीनं गुन्हा केल्यास वाहनाच्या मालकाला दंड 25 हजार रूपये आणि तीन वर्षांचा तुरुंगवास
- मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यास दंड 10 हजार रूपये किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास
- वाहन चालवताना सिग्नल तोडल्यास दंड 10 हजार रूपये किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास
- मोठमोठ्यानं हॉर्न वाजवल्यास दंड एक हजार रूपये किंवा दोन हजार रूपये
- वाहनाला विमा संरक्षण नसल्यास दंड दोन हजार रूपये किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास
- वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास, चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेकिंग केल्यास किंवा रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन चालवल्यास दंड 10 हजार रूपये किंवा दोन वर्षांचा तुरुंगवास
मोटर सायकल चालवण्याचा नियम
महाराष्ट्रात मोटर सायकल चालवण्याचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
- मोटर सायकल चालवण्यासाठी चालकाचे वय किमान 18 वर्षे असावे.
- चालकाला वैध मोटर सायकल चालवण्याचा परवाना (LMV / MC) असणे आवश्यक आहे.
- मोटर सायकलवर चालकाव्यतिरिक्त एकच प्रवासी बसू शकतो.
- मोटर सायकलचा वेग 40 किमी/तासपेक्षा जास्त नसावा.
- मोटर सायकलवर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे
- हेल्मेट घालणे सक्तीचे आहे
- डोक्यावर टोपी किंवा इतर कोणतीही वस्तू घालू नये
- गाडी चालवताना धूम्रपान /मद्यपान करू नये
- मोटर सायकल चालवताना फोनवर बोलू नये
- रस्त्यावरील चिन्हे व नियमांचे पालन करावे
Traffic rules in foreign countries
भारताशिवाय वेगवेगळ्या देशांमध्ये जर ट्राफिक नियमांचा विचार करायचा झाला तर हाँगकाँग अमेरिका मलेशिया जर्मनी जपान यामध्ये ट्रॅफिक नियम तोडल्यास लाखांमध्ये दंड आकारला जातो.
जपानमध्ये दारुच्या नशेत गाडी चालवल्यास 6, 77,115 रुपये दंड भरावा लागतो. इतर देशाचा विचार करायचा झाल्यास दारूच्या नशीब गाडी चालवल्यात अमेरिकेत 1,79,905 रुपये, जर्मनीत 1,18,359 रुपये, सिंगापूरमध्ये 2,58,771 रुपये आणि हाँगकाँगमध्ये 2,29,376 रुपये दंड भरावा लागतो.