Traffic Challan : गाडीवर असलेला फाइन ऑनलाईन कसा भरावा ? फाइन ऑनलाईन कसा चेक करावा …

Traffic Challan : नमस्कार मिञांनो, आपण दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवत असतो. आपल्याकडून कधी कधी कळत नकळत चुका होत असतात.जसे कि, सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे,ओव्हर स्पीडींग,नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादी. अशा अनेक कारणांमुळे आपल्याला महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून दंड लावला जातो. 

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची ? आणि जर खरंच चूक झालेली असेल तर हा फाइन ऑनलाइन कसा भरायचा ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण गाडीचा फाइन ऑनलाईन कसा भरायचा ते स्टेप बाय स्टेप समजून घेऊ.

Traffic challan payment system?

मित्रांनो सर्व प्रथम तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

१) सदरील वेबसाइटवर आल्यावर तुम्हाला E-Challan Payment Maharashtra State स्क्रीनवर दिसते. येथे तुम्हाला वेहिकल नंबर (Vehicle No.) आणि चलन नंबर (Challan No) हे पर्याय वापरून आपल्या वाहनाचा दंड पाहता येईल.

२) जर गाडीचा नंबर टाकायचा असेल तर चेसी नंबरचे (Chassis/Engine no.) शेवटचे चार आकडे टाकावे लागतात.

३) शेवटी I am not robot हा कँपचा कोड सोडवून सबमिट (Submit) बटन वर क्लिक करावे.

४) आता तुमच्या समोर आपल्या गाडीवर आत्तापर्यंत किती इ-चलन फाडले गेले आहेत याची यादी दिसते.

५) फाईन कोणत्या कारणास्तव लागलेला आहे ते ही समजून घेऊ शकता. कॉलम व्हू (View) मधील डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करून तुम्ही त्या चलनाची खालील माहिती सविस्तर बघू शकता.

  • चलन नंबर / Challan No.
  • चलनाची तारीख / Violation Date
  • ड्राइविंग लाइसेंस नंबर / License No.
  • गाडीचा नंबर / Vehicle No.
  • पेमेंट स्टेटस / Payment Status
  • चलन पैसे / Amount
  • चलनाची जागा / Challan Location
  • पुरावे / Evidences
  • चलनाची कारणे / Violations

Evidences भागात क्लिक केल्यावर तुमच्या गाडीला चलन फाडण्यावेळचा फोटो जोडलेला असतो.हा फोटो तुमचा आहे का? एकदा चेक करायचे आहे.जर हा फोटो तुमचा नसेल तर तुम्ही तक्रार करू शकता.Grievance चा ऑप्शन असेल तिथे आपण तक्रार दाखल करू शकता.

How To Pay Traffic Challan Online

  • आता जर खरच आपण चूक केली असेल तर दंड भरायचा आहे. शेवटी Select echallans & Click here to pay बटन क्लिक करायचे आहे.
  • आता पेमेंटच्या Terms and conditions, Security Policy वाचून घ्यायच्या आहेत.
  • ॲग्री (Agree) ऑप्शन वर टिक करायचे आहे. नंतर तुम्हाला उजव्या बाजूला Pay Now चे बटनावर क्लिक करा
  • आता तुम्हाला Pay Through Bill Desk या ऑप्शन वर क्लिक करा
  • आपल्याला पेमेंट करण्यासाठी पर्याय निवडावा लागतो जसे कि… क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड,एटीएम,इंटरनेट बँकिंग, वॉलेट/कॅश कार्ड, QR Code किंवा UPI यापैकी एका ऑप्शन द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता.

QR Code payment system

जर आपल्याला QR Code या ऑप्शन द्वारे पेमेंट करायचे असेल तर QR Code या ऑप्शन वर क्लिक करा

  • याठिकाणी Make Payment बटन वर क्लिक करा.
  • आता नवीन पेज वर तुम्हाला खाली QR Code दिसेल, त्यावर क्लिक करा. 
  • आता आपल्या UPI अँप च्या सहाय्याने QR Code स्कॅन करा.
  • ऑनलाईन स्कॅन पेमेंट पूर्ण झाल्यावर पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज स्क्रीनवर दिसेल.
  • शेवटी हिरव्या रेषेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटची पावती दिसते.
  • आता आपण पुन्हा महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या वेबसाईटवर जाऊन वाहन क्रमांक (Vehicle No) आणि चलन नंबर (Challan No) टाकून स्टेटस पाहू शकतो. याठिकाणी Payment Status मध्ये तुम्हाला चलन Paid झालेले दिसते.

वेबसाइट लिंक  https://mahatrafficechallan.gov.in

Leave a Comment

error: Don't Copy!!