Close Visit Mhshetkari

Top CNG Car : नोकरदार वर्गासाठी बेस्ट आहेत `या` CNG कार; रास्त किंमत अन् जबरदस्त फिचर पहाच …

Top CNG Car : नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी आता फोर व्हीलर चा वापर सर्रास होताना दिसत आहे. अशातच चार चाकी वाहनांच्या मागणीमध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते.

आता CNG सीएनजी किंवा (Electric Vehicle) इलेक्ट्रिकल बरोबरच गाड्यांच्या सुद्धा मागणीत वाढ झालेली आहे.इलेक्ट्रिक व्हेईकलचा अजून प्रभाव जास्त दिसत नसल्याने; सर्वसामान्य मध्यमवर्गीय सीएनजी कारकडे वळताना दिसतो.आज आपण सीएनजी कार मध्ये जास्त किमतीमध्ये जबरदस्त फिशर असणाऱ्या काही महत्त्वाच्या कार विषयी माहिती पाहणार आहोत.

Top 5 CNG Car In 2025

Maruti Suzuki Baleno CNG :- मारुती सुझूकी बलेनो या कारचे पेट्रोल मॉडेलसह आता सीएनजी मॉडेलही कारप्रेमींना आवडतांना दिसत आहे. स्टाईल आणि मायलेजच्या बाबतीतसुद्धा ही कार उत्तम असून, किंमत आहे 9.23 लाख ते 9.41 लाख रुपये आहे.

Tata Altroz CNG :- मजबुतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या टाटाच्या कारमध्ये येणारे टाटा अल्ट्रोज सीएनजी हे लोकप्रिय नाव आहे. मित्रांनो या कारच्या सीएनजी मॉडेलला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.Altroz CNG कारची किंमत 8.85 लाख ते 10.55 लाख रुपयांदरम्यान असल्याचे बोलण्यात येत आहे.कार 26.2KM/ Kg इतके मायलेज देते.

हे पण वाचा ~  Electric Vehicle : सन 2025 मध्ये भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालणार या इलेक्ट्रिक व्हेईकल कंपन्या  ..

Toyota Glanza CNG :- आता बलेनो कार चा पर्याय शोधत असाल तर, “टोयोटाची ग्लॅन्जा” ही कार एक जबरदस्त पर्याय ठरते.Glanza CNG कारची किंमत 8.63 लाख – 9.66 लाख रुपयांदरम्यान आहे.

Maruti Suzuki Dzire CNG :- मारुती सुझूकी डिझायर ही 8.39 लाख – 9.07 लाख रुपयांत उपलब्ध होणारी प्रसिद्ध सेडान कार आहे. Dzire CNG कार 31.12 km/kg इतके मायलेज देते. कमी मेन्टेनन्स आणि कमाल रिसेल किंमत यासाठीसुद्धा तुम्ही ही कार चांगली आहे.

Hyundai Aura CNG :- आता शेवटी CNG कारच्या शोधात असणाऱ्यांसाठी “ह्युंडई ऑरा” कार एक जबरदस्त पर्याय आहे. Aura CNG कारची किंमत 8.44 लाख – 9.05 लाख रुपया दरम्यान आहे. मित्रांनो कार 28 km/kg एवढे मायलेज देते. Hyundai Aura कारमध्ये 402 लीटरचा बूट स्पेसही देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!