Teacher Transfer : नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षकांसाठी आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झालेली असून सदरील प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण विहित करणेत आलेले आहे.
Online Teacher Transfer
जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सदरच्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या पार पडणार आहेत.त्यासाठी जिल्ह्यातील बदली प्रक्रियेसाठी पात्र शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपडेट असणे आवश्यक आहे. आता CEO, EO, TEACHER लॉग-इनवर दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात येईल.
- TEACHER : Submit Profile To BEO ०२/०३/२०२५ ते ०९/०३/२०२५
- BEO : Validate Teacher Profile – ०२/०३/२०२५ ते ०९/०३/२०२५
सदरील कालावधीत https://ott.mahardd.com/ या संकेतस्तलावर लॉग इन उपलब्ध असणार आहे. शिक्षकांना प्रोफाईल मधील Employment Details मध्ये स्वतःच्या लॉग इन मधून बदल करता येणार आहे मात्र Personal Details मधील माहितीत शिक्षक -ईनमधून कोणताही बदल करता येणार नाही.
शिक्षक बदली प्रक्रिया 2025
1) Personal Details जर शिक्षकांची Personal Details मधील माहितीत दुरुस्ती करावयाची असल्यास सोबत दिलेल्या नमुन्यात मा. मुख्यकार्यकारी अधिकारी / मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचेकडे अर्ज करावा लागेल.
सदरचे अर्ज गटशिक्षणाधिकारी याचे कार्यालयात दि.०५.०३.२०२६ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावेत.
सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खास दूतामार्फत जिल्हा कार्यालयात जमा करावेत. गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रमाणीकरण स्वाक्षरीशिवाय आलेले अर्ज या कार्यालयाकडून स्विकारले जाणार नसल्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांचे परवानगी शिवाय कोणीही दुरुस्ती अर्ज जिल्हा कार्यालयात जमा करू नयेत अशा सूचना आपले स्तरावरून सर्व शिक्षकांना द्याव्यात.
2) Employment Details जर शिक्षकांना Employment Details मधील माहितीत बदल करावयाचा असल्यास शिक्षकांनी स्वतः आपले शिक्षक लॉग ईन वरून योग्य तो बदल करून आपली माहिती Submit करावी. कोणत्याही शिक्षकांची चुकीची माहिती पोर्टलवर नोंद होणार नाही याबाबत आपले गटाकडील सर्व शिक्षकांना सूचित करावे.
Employment Details मध्ये शिक्षकांनी केलेले बदल गटशिक्षणाधिकारी यांनी आपले कार्यालयातील अभिलेखे व शिक्षकांनी सादर केलेले कागदोपत्री पुरावे या आधारे तपासून शिक्षकांच्या प्रोफाईल मधील माहिती गटशिक्षणाधिकारी लॉग-इन मधून दिलेल्या मुदतीत Validate करावी.
कोणत्याही शिक्षकांची प्रोफाईलमधील चुकीची माहिती आपलेकडून Validate होणार नाही याची खबरदारी घ्यावी. एखाद्या शिक्षकाची चुकीची माहिती पोर्टलवर Validate झाल्यास त्याचा विपरीत परिणाम संबधित शिक्षकाच्या व इतर शिक्षकांच्या बदलीवर होणार असल्याने तसेच शिक्षकांच्याकडून भविष्यात चुकीच्या माहितीसाठी अपील/तक्रार झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबधित गटशिक्षणाधिकारी यांची राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
सदरील ऑनलाईन बदली प्रकिया हि कालमर्यादित असल्यामुळे दिलेल्या विहित वेळेत आपले गटातील सर्व शिक्षकांकडून स्वतःची प्रोफाईल माहिती अचूक अपडेट नोंद केली जाईल व गटशिक्षणाधिकारी यांचेकडून Validate होईल याबाबत योग्य ते नियोजन करावे.