State Employee : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) १९८२ च्या नियम १०(४) व ६५ नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम/संशायस्पद सचोटीच्या राज्य शासकीय अधिकाऱ्यांला शासन सेवेतील मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याचे अधिकार समचित प्राधिकाऱ्यांना (नियुक्ती प्राधिकाऱ्यांना) आहेत.
State Employee new update
दिनांक १०.०६.२०१९ च्या शासन निर्णयान्वये शासकीय अधिकाऱ्यांची सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमविण्याचे निकष विहित करण्यात आलेले आहेत.
शासनाच्या सेवेतील वर्ग-१ व वर्ग-२ च्या राजपत्रित अधिकाऱ्यांची वयाच्या ५०/५५ वर्षापलीकडे किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमविण्यासाठी मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखाली पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सर्व मंत्रालयीन विभागांनी संबंधित सचिवांच्या मान्यतेने विभागीय पुनर्विलोकन समित्यांची स्थापना करणे आवश्यक आहे.
वरील तरतुदीस अनुसरुन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकाऱ्यांची वयाच्या ५०/५५ वर्षापलीकडे किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्यासाठीची पात्रापात्रता आजमविण्याच्या दृष्टीने पुनर्विलोकन करुन शिफारस करण्यासाठी खालीलप्रमाणे पुनर्विलोकन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सेवा पुनर्विलोकन समिती
१) अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग – अध्यक्ष
२) उपसचिव/सहसचिव (एसडी), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग – सदस्य
३) उप सचिव/सह सचिव (प्रशासन) – सदस्य
४) कक्ष अधिकारी/अवर सचिव (प्रशा-२) – सदस्य सचिव
समितीने शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या नियंत्रणाखालील पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकाऱ्यांची वयाची ५०/५५ वर्षापलीकडे किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवेत राहण्याची पात्रता आजमविण्यासाठी खालील निकषानुसार प्रकरणाची छाननी करावी.
१) वयाच्या ३५ व्या वर्षापूर्वी सेवेत असलेल्या वर्ग-१ व वर्ग-२ च्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रकरणांचे सध्याप्रमाणे वयाची ५० वर्षे पूर्ण होतेवेळी किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षे पूर्ण होतेवेळी, यापैकी जे प्रथम घडेल तेव्हा,एकदाच पुनर्विलोकन करण्याची सध्याची पध्दती कायम ठेवण्यात यावी.
सेवेत ठेवण्याचा निकष शारीरिक क्षमता,निर्विवाद सचोटी व “चांगला” पेक्षा कमी नाही असा अभिलेख विहित करण्यात यावा.
२) वयाच्या ३५ व्या वर्षानंतर सेवेत आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत वयाच्या ५५ वर्षे करावयाच्या पुनर्विलोकनासाठी शारीरिक क्षमता, निर्विवाद सचोटी व “चांगला” पेक्षा कमी नाही असा अभिलेख हा निकष विहित करण्यात यावा.
समितीची कार्यकक्षा
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा व सामान्य राज्य सेवेमधील गट-अ व गट-ब मधील पुनर्विलोकनास पात्र होणाऱ्या अधिकारी यांच्या वयाच्या ५०/५५ वर्षापलिकडे किंवा अर्हताकारी सेवेची ३० वर्षाचा सेवाकालावधी पूर्ण झाल्यावर त्यांची सेवा पुढे चालू ठेवण्यास पात्रापात्रता आजमविण्यासाठी विहित निकषानुसार पुनर्विलोकन करणे.