State Employee : नमस्कार मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. आपल्याला माहीत आहे की, होळीचा सण हा तोंडावर आलेला आहे.14 मार्च रोजी महाराष्ट्र मध्ये संपूर्ण देशात होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार असून त्यानंतर गुढीपाडवा सण असणार आहे.
State Employee Salary News
मित्रांनो, मार्च रमजान ईद द मुस्लिम बांधवांचा मोठा सण साजरा होणारा असून अशा परिस्थितीमध्ये राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारा संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. पाहूया सविस्तर
हॅपी टू हेल्प फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री शेख अब्दुल रहीम यांनी रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार लवकर व्हावा यासाठी सरकार दरबारी निवेदन सादर केले आहे.
राज्यातील शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांचा पगार 20 ते 22 मार्च दरम्यान करण्यात यावा अशी मागणी सदरील निवेदनात करण्यात आलेली आहे.
Employee Advance Salary update
मिञांनो निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे दिले होते. खरे पाहता हे निवेदन 5 मार्च रोजी या कार्यालयात जमा झाले.
आता हे निवेदन उपसंचालक कार्यालयाकडून माननीय शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. पुढील कार्यासाठी उपसंचालक कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे.
आता या निवेदनावर काय निर्णय घेतला जातो आणि राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रमजान ईद निमित्ताने लवकर पगार मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मार्च महिन्याचे वेतन हे 31 मार्च पूर्वी झाल्यास सणासुदीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल.
होळी रमजान ईद आणि गुढीपाडवा पाडवा अशा सर्वांच्या सुट्टीच्या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा राहिला तर त्यांना परिवारासोबत आनंदाने साजरा करण्यात येणार आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये महागाई भत्ता (DA) आणि महागाई भत्ता फरक (DA Arrears) वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार बिले परत पाठवण्यात आले होती. सध्या कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पगार सुद्धा मिळालेल्या नाही अशावेळी मार्च महिन्याचा पगारवेतनासाठी वेतन अनुदान किंवा निधी उपलब्ध होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.