Sovereign Gold Bond : सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना एक चांगली पाच दिवसांसाठी उपलब्ध झाली आहे.सरकारकडून सवलतीच्या दरात सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी योजना सुरू झाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा दुसरा टप्पा आज 11 सप्टेंबरपासून सुरु होत आहे.या योजनेतंर्गत ग्राहकांना 5,923 रुपये प्रति ग्रॅम दराने सोन्यात गुंतवणूक करता येणार आहे.
Sovereign Gold Bond Scheme
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून 8 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोव्हेरियन गोल्ड बाँड योजनेच्या दुसऱ्या सिरीजसाठी इश्यू किंमत 5,923 रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. आपण बॅंकेत प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन 99.9 % शुद्ध सोने खरेदी करू शकणार आहे.जर आपण ऑनलाइन खरेदी केली तर 50 रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जाणार आहे.ऑनलाईन खरेदीमुळे किंमत 50 रुपये कमी होऊन 5,873 रुपये प्रति ग्रॅम होईल.
तुम्हाला किती व्याज मिळेल?
सोव्हेरियन गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास, आपल्याला सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर 2.50 टक्के व्याज दिले जाणार आहे.सार्वभौम गोल्ड बाँडचा म्युच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा असणार आहे.5 वर्षांनंतर ग्राहकांना निवड रद्द करण्याची सुविधा सुद्धा दिली जाते.
गोल्ड बाँडअंतर्गत सोने कोठे खरेदी करावे?
सदरील गोल्ड बॉंड योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, NSE आणि BSE या ठिकाणी स्वस्त सोने खरेदी करता येणार आहे.आपण आपल्या Dmat Account च्या माध्यमातून सोने गुंतवणूक करू शकणार आहे.