Smartphone Unlock Tips : नमस्कार मित्रांनो आपण जर आपल्या स्मार्टफोनचा पासवर्ड विसरला असाल तर, काळजी करण्याची गरज नाही.आता आपण कस्टमर केअरला कॉल न करता सुद्धा आपल्या मोबाईल किंवा स्मार्टफोनचा पासवर्ड रिसेट करू शकता किंवा आपला मोबाईल अनलॉक करू शकता,तर चला पाहूया सोपी पद्धत…
How to unlock Smartphone ?
स्मार्टफोनमध्ये आपल्याला अनेक फीचर्स मिळतात की, ज्याद्वारे आपण पैसे खर्च न करता सुद्धा अनेक पर्याय वापरू शकता स्मार्टफोन द्वारे आपण अनेक गोष्टी सोप्या करू मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, अनेक वेळा आपल्या मोबाईलचा पासवर्ड आपण विसरतो किंवा काही कारणाने पासवर्ड वापरण्यास अडथळा येतो.अशा वेळेस आपण व स्मार्टफोनमध्ये एक अनलॉक फॅसिलिटी वापरू शकता.
पासवर्ड विसरला तर स्मार्टफोन कसा अनलॉक करायचा?
मित्रांनो अनेक वेळा आपल्या फोनचा पॅटर्न किंवा पासवर्ड विसरतो.आपल्याला आपला मोबाईल घेऊन मोबाईल शॉप किंवा अधिकृत सेवा केंद्रात जावे लागते. मित्रांनो,असा लॉक तोडण्यासाठी त्या ठिकाणी बराच पैसा सुद्धा मोजावा लागतो पण आता तुम्ही हे काम स्वतः घरी करू शकता.आपल्या मोबाईलचा पासवर्ड रिसेट करू शकता.
- सर्वप्रथम तुमचा फोन बंद करा
- आता पॉवर बटण आणि व्हॉल्यूम डाऊन बटण काही वेळ एकत्र दाबून धरून ठेवा.
- आपल्याला आता भाषा निवडण्याचा ऑप्शन दिसेल. येथे ‘English’ भाषा निवडा.
- यानंतर ‘Factory Reset’ चा ऑप्शन निवडावा लागेल. शेवटी ‘Wipe Cache’ चा ऑप्शन दिसेल.
मित्रांनो,यामध्ये एक अडचण आहे, आपल्या स्मार्टफोनमधून सर्व जुना डेटा डिलीट होईल आणि फोन लॉकशिवाय अनलॉक होईल.
सदरील फीचर Realme सोबत काही इतर निवडक स्मार्टफोनसाठी उपलब्ध आहे.