SIP Calculator : नमस्कार मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढली आहे. यातील “सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP)” हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक मार्ग आहे.
एसआयपीद्वारे गुंतवणूकदार दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून दीर्घकाळात मोठा नफा मिळवू शकतात.जर तुम्हाला कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त रिटर्न मिळवायचा असेल, तर Mutual Fund SIP परफेक्ट पर्याय आहे.
आज आपण म्युच्युअल फंड SIP मध्ये दररोज 100 रुपये वाचवून गुंतवणूक केल्यास ग्राहकांना 10 वर्ष, 20 वर्षे, 30 वर्ष आणि 40 वर्ष कालावधीत किती रिटर्न मिळणार याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Mutual Fund SIP Benefits
1. कमी गुंतवणूक, मोठा रिटर्न : एसआयपीद्वारे तुम्ही दरमहा कमी रक्कम गुंतवून दीर्घकाळात मोठा नफा मिळवू शकता.
2. दीर्घकालीन नियोजन : एसआयपी हा दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय आहे, ज्यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.
3. सवलतीचा लाभ : म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये तुम्हाला “रुपये-कॉस्ट अव्हरेजिंग “चा फायदा मिळतो, ज्यामुळे बाजारातील चढ-उताराचा तुमच्या गुंतवणुकीवर कमी परिणाम होतो.
SIP Invesment Calculator
जर तुम्ही दररोज फक्त “100 रुपये” (महिन्याला 3000 रुपये) एसआयपीमध्ये गुंतवणूक केली, तर वेगवेगळ्या कालावधीत तुम्हाला खालीलप्रमाणे रिटर्न मिळू शकते.
1) 40 वर्षांसाठी गुंतवणूक
- एकूण गुंतवणूक : 14.40 लाख रुपये
- अंदाजित रिटर्न (12% दराने) : 3.56 कोटी रुपये
- नफा : 3.42 कोटी रुपये
2) 30 वर्षांसाठी गुंतवणूक
- एकूण गुंतवणूक : 10.80 लाख रुपये
- अंदाजित रिटर्न (12% दराने) : 1.05 कोटी रुपये
- नफा : 95.09 लाख रुपये
3) 20 वर्षांसाठी गुंतवणूक
- एकूण गुंतवणूक : 7.20 लाख रुपये
- अंदाजित रिटर्न (12% दराने) : 29.97 लाख रुपये
- नफा : 22.77 लाख रुपये
4) 10 वर्षांसाठी गुंतवणूक
- एकूण गुंतवणूक : 3.60 लाख रुपये
- अंदाजित रिटर्न (12% दराने) : 6.97 लाख रुपये
- नफा : 3.37 लाख रुपये