Share Market : सरकारी कर्मचारी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात का ? जाणून घ्या नियम आणि मर्यादा ! 

Share Market : आजकाल “शेअर मार्केट” मध्ये गुंतवणूक करणे एक लोकप्रिय आणि फायदेशीर पर्याय बनला आहे. पण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे.

सरकारी नोकरीत असताना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का? यासंदर्भातील नियम आणि मर्यादा आज आपण जाणून घेणार आहोत.

Share Market Investment Rules

सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा (आचार) नियम, १९६४ अंतर्गत विविध मर्यादा आणि नियमांचे पालन करावे लागते. या नियमांनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी आहे, पण काही विशिष्ट अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

1) इंट्रा-डे ट्रेडिंग आणि फ्युचर ऑप्शन्सवर बंदी :-

कलम ३५ अ नुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना “इंट्रा-डे ट्रेडिंग” किंवा “फ्युचर ऑप्शन्स” सारख्या सट्टेबाजीच्या व्यवहारांमध्ये भाग घेता येत नाही.अशा व्यवहारांमध्ये धोका जास्त असतो आणि ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या नैतिक आचारसंहितेला धक्का देतात.

2) दीर्घकालीन गुंतवणूकीस परवानगी :-

सरकारी कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.

सासरी गुंतवणूक ‘स्टॉक ब्रोकर’ च्या माध्यमातून केली पाहिजे आणि ती दीर्घकालीन उद्देशाने असावी.

3) हितसंबंध टाळणे :- सरकारी कर्मचाऱ्यांनी अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू नये, ज्यांच्याशी त्यांचा हितसंबं आहे.

उदाहरण: जर कर्मचाऱ्याच्या विभागात एखाद्या कंपनीशी करार झाला असेल, तर त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे.

हे पण वाचा ~  Mutual Fund : धक्कादायक .. SIP गुंतवणूकदारांना मोठा धक्का ! 27 पैकी तब्बल 26 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड तोट्यात ! आपण केलीय का गुंतवणूक ?

4) राखीव कोट्यातील शेअर्सवर बंदी :- काही कंपन्यांचे शेअर्स “राखीव कोटा” अंतर्गत संचालकांसाठी राखून ठेवलेले असतात. सरकारी कर्मचाऱ्यांना अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी नाही.

5) IPO मध्ये गुंतवणूकीस बंदी :- सरकारी कर्मचाऱ्यांना IPO (Initial Public Offering) किंवा इतर शेअर विक्री प्रक्रियेत सहभागी होता येत नाही.सदरील नियम कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही लागू होतात.

शेअर बाजार गुंतवणुकीची माहिती देणे बंधनकारक

२०१९ मध्ये सरकारने नवीन नियम लागू केले आहेत, ज्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीबाबत माहिती देणे बंधनकारक आहे.

  • अ आणि ब गटातील कर्मचारी :- जर गुंतवणूक ५०,००० रुपयांपेक्षा जास्तअसेल, तर त्याची माहिती सादर करणे आवश्यक आहे.
  • क गटातील कर्मचारी :- जर गुंतवणूक २५ हजर रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्याची माहिती सादर करणे आवश्यक आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे, पण त्यासाठी विविध नियम आणि मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे.इंट्रा-डे ट्रेडिंग,फ्युचर ऑप्शन्स आणि IPO मध्ये गुंतवणूक करण्यास बंदी आहे.

विशेष म्हणजे गुंतवणुकीची माहिती सादर करणे बंधनकारक आहे.योग्य नियमांचे पालन करून सरकारी कर्मचारी शेअर मार्केटमधून फायदा मिळवू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!