Close Visit Mhshetkari

Service Book : सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या सर्विस बुक मध्ये कोणत्या नोंदी कराव्या ? पहा सेवा पुस्तकातील महत्वाच्या नोंदी …

Service Book : सेवा पुस्तके कर्मचाऱ्याचा सेवेचा अत्यंत महत्त्वाचा अभिलेख आहे.सेवा पुस्तक अपूर्ण असेल /नसेल /काही आक्षेप असतील तर,कर्मचाऱ्यास अधिकाऱ्यास निवृत्तीनंतरचे देय लाभ मिळण्यास अनेक अडचणी येत असतात.

महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 36 परिशिष्ट -4 नुसार Service Book नमुना विहित करण्यात आला आहे.मुंबई वित्तीय नियम 1959, नियम – 52 परिशिष्ट- 17 अन्वये सेवा पुस्तके अभिलेख जतनाच्या ‘अ’ वर्गात मोडते.थोडक्यात सेवा पुस्तके प्रदीर्घ कालावधीपर्यंत जतन करून ठेवणे आवश्यक असते.

Employees Service Book Entry

सेवा पुस्तके कर्मचाऱ्यांचे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज असते. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपले मूळ सेवा पुस्तक तसेच, दुय्यम सेवा पुस्तक अद्यावत करून वेळोवेळी महत्त्वाच्या नोंदी घेतल्या किंवा नाही याची खातर जमा करून घ्यावी.

सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी यांची बदली झाल्यानंतर मूळ सेवा पुस्तकात प्रलंबित असलेल्या नोंदी करून घ्याव्यात कधीही मूळ सेवा पुस्तक ताबडतोब किंवा घाईने ताब्यात घेऊ नये सदरील सेवा पुस्तक एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात विहित मार्गाने पाठवावे.

सेवा पुस्तके प्रामुख्याने 5 उपविभागात विभागले जाते.

  • पहिले पान
  • नियुक्ती तपशिल
  • रजेचा हिशोब
  • अर्थकारी सेवेची प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशील
  • सेवा पडताळणी

सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या सेवापुस्तकेत खालील प्रकारच्या महत्त्वाच्या नोंदी करणे आवश्यक असतात.

पहिल्या पानावरील नोंदी

मूळ तसेच दुय्यम सेवा पुस्तक प्रत्येकी पाच ते सहा पुस्तकांचे एकत्रित बाइंडिंग करून तयार करून घ्यावे व त्याला पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत पृष्ठांकन करावे.

जन्म दिनांक नोंद :- जन्मतारखेची नोंद घेते वेळेस कशाच्या आधारे पडताळणी केली (इ. १० वी सनद) त्याचा उल्लेख करावा. जन्मतारीख अंकी व अक्षरी लिहून कार्यालय प्रमुखांची स्वाक्षरी घ्यावी.

जात व धर्म :- सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर जात व धर्म लिहावा.मूळ जात लिहून आपण ज्या प्रवर्गातून सेवेत लागलो त्याचा नोंद करावी.

शैक्षणिक – व्यवसायिक अहर्ता :- नोकरीत प्रवेश करत असताना आपल्या शैक्षणिक अहर्तेची नोंद सेवा पुस्तकात करून घेऊन त्यात वाढ झाल्यास त्या प्रमाणपत्राच्या उल्लेखासह त्या नोंदी साक्षांकित कराव्यात.

पत्ता (Address) :- वडीलाचे नाव व मूळ राहण्याचे ठिकाण नोंद करावी.

वैद्यकीय प्रमाणपत्रा :- मेडिकल सर्टिफिकेट नोंद.

प्रथम नियुक्तीनंतरच्या सेवा पुस्तक नोंदी

  • प्रथम नियुक्ती आदेश
  • प्रथम रुजू दिनांक
  • प्रथम नियुक्ती स्थायी/ अस्थायी बाबतची नोंद व नियुक्तीचा प्रवर्ग
  • नियुक्ती पदनाम व वेतन श्रेणी
  • स्वग्राम घोषणा पत्राची नोंद
  • गट विमा योजना सदस्य नोंद
  • अपघात विमा योजना सदस्य नोंद व विमा कपात रक्कम
  • हिंदी/मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण / सूट नोंद
  • संगणक अहर्तता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची/ सूट नोंद
  • चारित्र्य पडताळणी नोंद
  • स्थायी प्रमाणपत्राची नोंद
  • जात पडताळणी बाबतची नोंद
  • टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
  • भविष्य निर्वाह निधी (GPF) खाते क्रमांक नोंद
  • DCPS/ NPS खाते क्रमांक नोंद
  • विभागीय परीक्षा उत्तीर्ण अथवा सूट नोंद
  • परिविक्षाधीन कालावधी समाप्त करून नियुक्ती नियमित केलेल्या आदेशाची नोंद
  • छोटे कुटुंब प्रमाणपत्र
  • अपंगासाठी राखीव पदावर नियुक्ती झाल्यास अपंगत्वाबाबतचे विहित वैधता प्रमाणपत्र
  • निष्ठेची शपथ पत्र कर्मचाऱ्याकडून घेऊन ते साक्षांकित करून सेवा पुस्तकात चिकटावे. 

(सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक 11/9/ 2014 व दिनांक 6/10/2015 )

हे पण वाचा ~  Home Loan Charges : गृह कर्ज घेताना आकारले जातात हे छुपे चार्जेस! आत्ताच पहा यादी; नक्कीच वाचतील पैसे

सर्व्हिस बुक महत्वाच्या बाबी घटना नोंद

वार्षिक वेतनवाढ : – वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्रमांक 8 मध्ये कर्मचाऱ्याने स्वाक्षरी करावी.

बदली नोंद :- कर्मचाऱ्याची बदली झाली असल्यास बदली आदेश तसेच कार्यमुक्तीचा आदेश, नवीन पदावर, रुजु झाल्याचा दिनांक,इत्यादी तपशिलाची नोंद करण्यात यावी. जर पदग्रहण अवधी अनुज्ञेय असेल तेथे पदग्रहण अवधीची नोंद करावी.

पदोन्नती :- पदोन्नती / पदावन्नतीच्या आदेशाची नोंद घेऊन पदोन्नती / पदावन्नतीच्या पदावर रुजु दिनांकाची नोंद करावी.पदोन्नती / पदावन्नतीच्या पदाच्या वर्गाची / वेतनश्रेणीची व वेतन निश्चितीच्या आदेशाची नोंद

वेतन निश्चिती :- वेतन निश्चितीसाठी विकल्प दिला असल्यास त्याची नोंद करावी.

वेतन आयोग पडताळणी :- ज्या वेळेस वेतन श्रेणीत बदल झाला असेल त्यावेळेसची वेतन आयोगानुसार पडताळणी पथकाकडुन करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची नोंद करून घ्यावी.मनासे (वे सु) नियम 1978 नुसार वेतन पडताळणी पथकाकडुन वेतननिश्चिती पडताळणी झालेली नसल्यास शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 20-08-1986 नुसार कार्यालय प्रमुखाने नोंदविलेल्या प्रमाणपत्रकाची नोंद करण्यात यावी.

प्रशिक्षण/सेवार्गत प्रशिक्षणाची नोंद :- अनिवार्य प्रशिक्षण/सेवार्गत प्रशिक्षणाची नोंद / पायाभूत प्रशिक्षण / विदेश प्रशिक्षणासाठी पाठविले असल्यास त्याची नोंद करावी.

वार्षिक सेवा पडताळणी नोंद

रजा सवलत :- स्वग्राम/महाराष्ट्र दर्शन रजा सवलत घेतल्याची नोंद घ्यावी.

गट विमा योजना :- गट विमा योजनेची नोंद वेळोवेळी घ्यावी.वर्गणीत बदल झाल्यास त्याची दिनांक निहाय व थकीत रकमेसह वसुलीची नोंद लक्षपूर्वक करून घ्यावी. 

वेतन आयोगाच्या फरक :- सहाव्या, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा रोखीने / GPE / मध्ये जमा तपशिल प्रमाणक क्रमांक व दिनांक टाकून नोंद करून घेण्यात यावी. 

सेवा समाप्ती :- सेवेतून कमी केली असल्यास त्या आदेशाची नोंद करावी 

पुर्ननियुक्ती :- पुर्ननियुक्ती केली असल्यास त्या आदेशाची नोंद करण्यात यावी.

सेवा खंड :- दोन नियुक्तीमध्ये, खंड असल्यास खंडाची नोंद तसेच दोन नियुक्त्यांमधील खंड क्षमापित केला असल्यास त्याची नोंद घ्यावी.

निलंबन :- सेवा कालावधीतील निलंबन, निलंबन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद,सेवेतील झालेली शिक्षा,संपात सहभाग घेणे,राजीनामा देणे / परत घेणे,अनाधिकृत गैरहजेरी

पुरस्कार :- सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारे पुरस्कार, गौरव , तदनुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी लक्षपूर्वक करून घेण्यात याव्यात. 

आगाऊ वेतनवाढ :-आगाऊ वेतनवाढी मंजुर केलेल्या आदेशाची नोंद व वेतननिश्चीती किंवा ठोक रकमा मंजुर केल्याची नोंद करावी.

प्रतिक्षाधीन कालावधी :- सक्तीचा प्रतिक्षाधीन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद करावी.

सेवापुस्तकांना चिकटवायचे महत्वाचे दस्तावेज

  • सर्व महत्त्वाचे आदेश / प्रमाणपत्र सेवापुस्तकात लावावे म्हणजे ते तात्काळ उपलब्ध
  • होतात, जसे
  • वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical certificate)
  • जात वैधता प्रमाणपत्र ( Cast validity)
  • नामनिर्देशन ( Nominations)
  • GIS (गटविमा)
  • GPF ( भविष्य निर्वाह निधी)
  • Pension
  • DCRG
  • NPS
  • DCPS
  • कुटुंब प्रमाणपत्र
  • अपघात विमा
  • वेतन निश्चिती (वेतन आयोग / पदोन्नती / इतर)
  • विकल्प (Option Form)
  • ज्यादा रक्कम अदायगी वसुलीचे हमीपत्र
  • वेतन आयोग फरकाच्या हप्तेचा तपशिल, तसेच प्रदान रकमेचा प्रमाणक क्रमांक व दिनांक
  • चारित्र्य प्रमाणपत्र
  • MSCIT / तत्सम प्रमाणपत्र
  • नाव बदललेले असले तर त्याबाबतचे राजपत्र
  • स्वग्राम घोषित आदेश
  • GIS बद्दल आदेश
  • स्थायित्व प्रमाणपत्र आदेश
  • परिविधाधीन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश
  • मराठी / हिंदी परिक्षा पास / सुट आदेश
  • विभागीय परीक्षा उत्तीर्ण / सूट आदेश

सेवा पुस्तक नमुना येथे डाऊनलोड करा ➡️ Service Book PDF

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!