Senior Citizens Schemes : नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे.आता ज्येष्ठ नागरिकांना 20 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे;तर या मदतीचा कोण फायदा घेणार ? पात्रता आणि अटी काय ?
सदरील मदत मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया,आवश्यक कागदपत्रे आणि अटी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
Senior Citizens Schemes Benefits
मित्रांनो, सदरील योजना चा लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागणार आहे अर्ज करण्याची पद्धत आणि संपूर्ण प्रक्रिया याविषयी सरकारने मार्गदर्शन केले आहे.
आजच्या काळात निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य टिकवणे हे मोठे आव्हान आहे. आजकालच्या महागाईचा जमान्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य आणि इतर खर्चासाठी उत्पन्न असणे आवश्यक आहे. यासाठी पेन्शनर धारक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षिततेसाठी योग्य गुंतवणूक पर्याय शोधणे गरजेचे ठरते.
Senior citizen saving scheme rules
भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) हा एक उत्तम योजना आणली असून यामध्ये सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळतो.परिणामी अनेक निवृत्त व्यक्ती याकडे आकर्षित होतात. त्यामुळे आर्थिक सुरक्षेसाठी ही योजना कशी उपयुक्त आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
SCSS योजना मुख्यतः 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. असे असले तरी 55 ते 60 वयोगटातील निवृत्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्यामध्ये स्वच्छ निवृत्ती (VRS) किंवा सुपरअॅन्युएशनअंतर्गत निवृत्त झालेले असणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी गुंतवणूक करायचे असल्यास अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (SCSS) किमान1 हजार पासून गुंतवणूक करता येते. एका ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यात जास्तीत जास्त 30 लाख रुपये पर्यंत ठेवता येते. त्यापेक्षा जास्त रकमेसाठीचे किंवा ऑनलाईन पेमेंट करावे लागते या योजनेचे खाते पोस्ट ऑफिस किंवा मान्यता प्राप्त बँकेत उघडावे लागते.
SCSS Interest Rate
सध्या SCSS योजनेत 8.2% वार्षिक व्याजदर मिळत असून सुरक्षित गुंतवणुकीच्या इतर पर्यायांपेक्षा अधिक आहे. या योजनेत बचत केल्यानंतर किंवा गुंतवणूक केल्यानंतर दर तीन महिन्यांनी व्याजाची रक्कम नियमित स्वरूपात मिळते. परिणामी नियमित उत्पन्नाचा एक स्त्रोत ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार होतो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
उदाहरणार्थ, एखाद्या ज्येष्ठ नागरिकांनी तीस लाख रुपये पर्यंतचे गुंतवणूक केली तर प्रत्येक ती महिला सुमारे 60 हजार 150 व्याज मिळणार आहे. म्हणजेच वार्षिक 2 लाख 40 हजार 600 रुपये व्याज खात्यात जमा होईल. थोडक्यात एका वर्षाचा विचार करायचा झाल्यास दरमहा 20 हजार रुपये आर्थिक उत्पन्न आपल्याला या माध्यमातून प्राप्त होईल.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम चा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे सदरील गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते.
साधारणपणे एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये पर्यंत कर सवलत आपल्याला मिळत असते.जर एकूण वार्षिक उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल, तर फॉर्म 15G किंवा 15H सादर करून TDS वजा करण्यास टाळता येते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते कालावधी
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) खाते सुरुवातीला 5 वर्षांसाठी उघडले जाते. मुदत संपल्यानंतर खासदाराची इच्छा असल्यास परत तीन वर्षाचा कालावधी या योजनेसाठी वाढवून देण्यात येतो वाढीव कालावधीत त्या त्या वेळी लागू असलेल्या व्याजदरांचा फायदा योजनेस मिळत असतो.जर एखाद्या खातेदाराला मुदत व पैसे काढायचे असल्यास पैसे काढता येतात यासाठी उदंड आकारला जातो.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराच्या निधनानंतर त्याने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला रक्कम मिळण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ असते.
सध्याच्या आधुनिक युगात ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित करता येते. ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने व्याजाचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात आणि खात्याचा संपूर्ण तपशील घरबसल्या पाहता येतो.