School Holiday : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
School Holiday Maharashtra 2025
संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2025 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार, दि.02 में, 2025 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेण्यात येईल.
3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार दि.16 जून, 2025 रोजी सुरु करण्यात याव्यात.
4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा सोमवार, दि.23 जून, 2025 ते 28 जुन 2025 पर्यंत सकाळ सत्रात 7.00 ते 11.45 यावेळेत सुरु करण्यात याव्यात. सोमवार दि.30.06.2025 पासून नियमित वेळेत सुरु करण्यात येणार आहे.
सदरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.