School Exam : शैक्षणिक इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा वेळापत्रक जाहीर; पहा केव्हा होणार परीक्षा ..

School Exam : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस अथवा एप्रिल महिन्यांमध्ये शाळास्तरावरुन घेण्यात येतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरु असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने परीक्षांचे आयोजन वर्षा अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो.

School Exam Timetable 2025

प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. सबब, राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी व उपलब्ध वेळेचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी राज्यातील शाळांमध्ये वार्षाअखेरीस घेण्यात येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात करण्याचे विचाराधीन आहे.

राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चावणी-२ अशा तीन चाचण्यांचे आयाजन करण्यता येणार आहे.

चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षांचा कालावधी समान ठेवण्यासाठी याद्वारे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

सन.२०२४-२५ मध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी वार्षिक परीक्षा व संकलित चाचणी २ (नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT) आयोजनाबाबत वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

वार्षिक परीक्षा/संकलित चाचणी-२ व PAT २०२४-२५ वेळापत्रक (इ. १ली ते ९ वी)

  • ०८/०४/२०२५ : इ. ५वी – प्रथम भाषा (PAT-3), इ. ६वी/७वी – प्रथम भाषा (संकलित चाचणी-२/PAT-3)
  • ०९/०४/२०२५ : इ. १ली/२री – प्रथम भाषा (संकलित चाचणी-२/PAT-3), इ. ३री/४थी – प्रथम भाषा (PAT-3), इ. ५वी – इंग्रजी (PAT-3), इ. ६वी/७वी – इंग्रजी (संकलित चाचणी-२/PAT-3)
  • ११/०४/२०२५ : इ. १ली/२री – इंग्रजी (संकलित चाचणी-२/PAT-3), इ. ३री/४थी – इंग्रजी (PAT-3), इ. ५वी – गणित (PAT-3), इ. ६वी/७वी – गणित (संकलित चाचणी-२/PAT-3), इ. ८वी – गणित (भाग १) (PAT-3)
  • १९/०४/२०२५ : इ. १ली/२री – गणित (संकलित चाचणी-२/PAT-3), इ. ३री/४थी – गणित (PAT-3), इ. ५वी – प्रथम भाषा (वार्षिक), इ. ६वी/७वी – प्रथम भाषा (संकलित चाचणी-२/PAT-3), इ. ८वी – गणित (भाग २) (PAT-3)
  • २१/०४/२०२५ : इ. १ली/२री – प्रथम भाषा (वार्षिक), इ. ३री/४थी – प्रथम भाषा (वार्षिक), इ. ५वी – गणित (संकलित चाचणी-२/PAT-3), इ. ६वी/७वी – गणित (PAT-3), इ. ८वी – द्वितीय/संयुक्त भाषा (वार्षिक)
  • २२/०४/२०२५ : इ. १ली/२री – प्रथम भाषा (संकलित चाचणी-२/PAT-3), इ. ३री/४थी – द्वितीय/संयुक्त भाषा (वार्षिक), इ. ५वी – द्वितीय/संयुक्त भाषा, इ. ६वी/७वी – इंग्रजी (वार्षिक)
  • २३/०४/२०२५ : इ. १ली/२री – प्रथम भाषा (संकलित चाचणी-२), इ. ३री/४थी – इंग्रजी (वार्षिक), इ. ५वी – इंग्रजी (संकलित चाचणी-२/PAT-3), इ. ६वी/७वी – इंग्रजी (PAT-3), इ. ८वी – गणित (वार्षिक)
  • २४/०४/२०२५ : इ. १ली/२री – गणित (संकलित चाचणी-२), इ. ३री/४थी – गणित (वार्षिक), इ. ५वी – गणित (संकलित चाचणी-२/PAT-3), इ. ६वी/७वी – गणित (PAT-3), इ. ८वी – विज्ञान (वार्षिक), इ. ९वी – विज्ञान (संकलित चाचणी-२)
  • २५/०४/२०२५ : इ. १ली/२री – इंग्रजी (संकलित चाचणी-२), इ. ३री/४थी – परिसर अभ्यास-१ (संकलित चाचणी-२), इ. ५वी – परिसर अभ्यास १/२ (वार्षिक), इ. ६वी/७वी – सामाजिक शास्त्रे (वार्षिक), इ. ९वी – सामाजिक शास्त्रे (संकलित चाचणी-२)
हे पण वाचा ~  National Education Policy : नवीन शैक्षणिक धोरण जाहीर ! पहा राज्यातील शाळांमध्ये CBSC पॅटर्नची कशी होणार अंमलबजावणी ?

नियतकालिक मूल्यांकन चाचणी PAT सूचना

१) संकलित मूल्यमापन- २ साठी परीक्षांचे आयोजन शाळा स्तरावरुन करण्यात येईल तथापि त्यांसाठी यासोबत दिलेल्या वेळापत्रकाचा वापर करण्यात यावा.

२) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत इयत्ता ३ री ते ९ वी साठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी संकलित मूल्यमापन- २ च्या प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाकडून पुरविण्यात येतील. इतर व्यवस्थापनाच्या शाळांना सर्व प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करावयाच्या आहेत.

 

३) इयत्ता १ ली व २ री साठी सर्व विषयांच्या व इ. ३ री ते ९ ची अन्य विषयांच्या संकलित चाचणी-२/लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे.

४) इयत्ता ९ वी साठी PAT शिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यासोवत देण्यात आलेले नाही ते शाळास्तरावरून ठरविण्यात यावे.

५) वेळापत्रकात नमूद न केलेल्या (कलाशिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, इत्यादी) श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळास्तरावर करण्यात याये.

६) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी २ घ्यावयाची आहे. इतर विषयांसाठी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी- २ घेण्यात यावी.

७) तथापि, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दि. ०७/१२/२०२३ मधील तरतुदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यावयाची आहे. PAT-३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही.

टीप- इ. ५ वी व इ.८ वी मधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडावाव्या लागतील. त्यानुसार नियोजन करावे. इयत्ता पाचवी व आठवी वगळता अन्य इयत्तांकरिता कोणत्याही विषयांची दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

८) शाळेच्या स्थानिक वेळेनुसार (सकाळ सत्र / दुपार सत्र) परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य शाळांना राहील. तथापि यासोबत दिलेल्या वेळापत्रकानुसार त्या विषयाची परीक्षा त्याच तारखेस हईल याची दक्षता घ्यावी.

९) तोडी /प्रात्यक्षिक परीक्षा त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घेण्यात यावी. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी अथवा उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

१०) संकलित चाचणी- २ च्या कालावधीत शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी त्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.

११) राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिन ध्वजारोहनानंतर दि. ०१/०५/२०२५ रोजी जाहीर करण्यात यावा. याचबरोबर ०२ मे २०२५ पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी सुरु होईल.

१२) सदर सूचना राज्यमंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाच्या शाळांना लागू असणार नाहीत.

संकलित मूल्यमापन चाचणी – २

संकलित चाचणी- २ आयोजनाची जबाबदारी जिल्हास्तरावर प्रायार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांची असेल. त्यांनी सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!