Close Visit Mhshetkari

School Education : शालेय परीक्षा संदर्भात नवीन अपडेट; इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ एप्रिलपासून; तर उन्हाळी सुट्टया १५ दिवसांनी घटल्या ! 

School Education : नमस्कार मित्रांनो, देशात त्याचबरोबर राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.अंगणवाड्या राज्यातील शाळांना जोडण्यात येणार याचीच पूर्वतयारी म्हणून इयत्ता पहिलीचा वर्ग आता एक एप्रिल पासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

School Education Vacation update

NEP 2025 नुसार यंदा अंगणवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे. ‘बालभारती’कडून सध्या युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई करण्याचे काम जोरात सुरू आहे.

‘सीबीएसई’च्या धर्तीवर राज्यातील सर्वच शाळा 1 एप्रिल पासून सुरू करण्याचा सरकारचा मानस होता परंतु कमी कालावधी आणि पाठ्यपुस्तक विविध योजनांचा या बघता सरकारने हा निर्णय सध्या तरी गुलदस्ता ठेवलेला दिसून येत आहे यावर्षी फक्त इयत्ता पहिलीचा वर्ग १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाची (school Education) सुरवात त्याचवेळी होणार आहे.

मित्रांनो, शालेय परीक्षण संदर्भात सुद्धा सरकारने मोठा निर्णय घेतला असून आतापर्यंत १५ एप्रिल पर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती.पात्र नवीन वेळापत्रकानुसार आता शालेय परीक्षा ८ ते २५ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे.परिणामी सुट्ट्यांचा कालावधी सुमारे १५ दिवसांनी कमी झाला आहे.

आता एप्रिल पासून नवीन शैक्षणिक सुरू वर्ष सुरू व्हावे यासाठी शैक्षणिक कामकाजाचे दिवस सुद्धा 234 करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळा एप्रिलपासून सुरू झाली, तरी १ मेनंतर निश्चित काळातील उन्हाळा सुटी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.१० ते १५ जूनपासून पुन्हा शाळा सुरू होतील, असा बदल असणार आहे.

हे पण वाचा ~  Education : राज्यातील पहिली ते आठवीच्या शाळा संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय ! आता 'या ' शाळेत होणार ..

इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना एक एप्रिल पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयारी सुरू केली आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील २२० दिवस अध्यापन करणे शक्य होणार आहे.

सर्वच शाळांच्या वार्षिक परीक्षा एकाचवेळी घेण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु आता शिक्षण विभागाच्या या नियोजनावर शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

School Education Exam Timetable

शिक्षण विभागाच्या सूचनेस अनुसरून २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी-१ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

वेळापत्रकाचा सुनियोजित वापर करण्यात यावा. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा स्वतंत्रपणे घ्यावी, शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यायची आहे.

एकाच वेळी नियमित परीक्षा आणि संकलित मूल्यमापनाचे नियोजन सोपविण्यात आल्याने शिक्षकांची धावपळ होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना ज्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुट्टया दिल्या जातात. त्या पंधरा दिवसांनी कमी होणार आहेत. यामुळे दोन परीक्षांचे नियोजन करताना कमी अवधी मिळणार असल्याने चार दिवसांतच गुणपत्रिका कशा तयार करायच्या, असा प्रश्न आहे. – विनोद लुटे, ठाणे जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी सुट्टया कपातीचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार तालुक्यातील शाळांना सूचना दिल्या आहेत. – भाऊसाहेब चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, शहापूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!