Close Visit Mhshetkari

School Education : आनंदाची बातमी …. इयत्ता पहिली ते आठवीतील “या” विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता! शासन निर्णय निर्गमित …

School Education : केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ (RTE 2009) च्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११, पारित केले आहेत.

कोणत्या मिळणार विद्यार्थ्यांना वाहतुक भत्ता ?

सदरील नियमा नुसार इयत्ता पहिली ते पाचवी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या (School Education) बालकांबाबत वस्ती (Habitations) नजीकच्या १ किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत तसेच खंड (ख) नुसार इयत्ता सहावी ते आठवी यामध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्तीनजीकच्या ३ किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत शाळा उपलब्ध नाही,अशा राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या लहान वस्तींमधील (Habitations) बालकांकरिता शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतुक भत्ता/सुविधा उपलब्ध करून द्यावयाची आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी, वसतिस्थाने घोषित करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी सर्व जिल्हे / महानगरपालिका यांच्याकडून शाळा व वसतिस्थाने (Habitations / Settlements) यातील अंतराबाबतच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या विश्लेषणाअंती प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक इयत्तांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शहरी व ग्रामीण वसतिस्थानातील विद्यार्थ्यांना वाहतुक सुविधा / भत्ता प्रदान करण्यात येणार आहे.

ग्रामीण व शहरी ३३४१ वस्तीस्थाने (Habitations) व एकूण २०४२२ विद्यार्थी संख्या निश्चित केली असून, सन २०२५-२६ या वर्षासाठी सदर वसतिस्थाने घोषीत करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा ~  CBSE Pattern Formula : एक एप्रिल पासून राज्यात सीबीएससी पॅटर्न; कशी असणार शैक्षणिक सत्र व नियोजन पहा सविस्तर...

RTE 2009 – School Education

मित्रांनो, RTE 2009 नुसार ५ कि.मी.च्या अंतराच्या आत माध्यमिक वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उपलब्ध नाही, अशा राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या लहान वस्तीमधील (Habitations) बालकांकरिता शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतुक भत्ता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील एकूण ३३४१ वसतिस्थाने (Habitations) व एकूण २०४२२ विद्यार्थी संख्या सोबत जोडलेल्या Annexure-A. Annexure- B Annexure- C मध्ये नमूद केल्यानुसार सन २०२५-२६ या वर्षासाठी पात्र ठरविण्यात आली आहेत.

इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्याच्या वसतिस्थानाच्या (निवासस्थान) १ कि.मी. च्या परिसरात, इ. ६ वी ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या ३ कि.मी. च्या परिसरात व इ. ९ वी व इ.१० वी च्या विद्यार्थ्यांच्या वसतिस्थानाच्या ५ कि.मी. च्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे, यासाठी विद्यार्थ्यांना वाहतुक भत्ता (Travel Allowance) देण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी सदरची वस्तीस्थाने घोषित करण्यात आली आहेत.

सदर योजनेतील लाभार्थ्यांना वितरीत करावयाची अनुज्ञेय रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट (DBT) जमा करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 thought on “School Education : आनंदाची बातमी …. इयत्ता पहिली ते आठवीतील “या” विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता! शासन निर्णय निर्गमित …”

  1. I am highschool english teacher in the Anu danit Adhiwashi pry, highschool palam TQ. Palam dis. Parbhani maharashtra. I am retayerment english teacher. 2020 years. My WhatsApp number only one and mobno.8381008161

error: Don't Copy!!