SBI Mutual Fund : आजच्या काळात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु Mutual Fund हा लोकांचा पहिला पसंतीचा पर्याय बनत आहे.
विशेषतः SIP (सिस्टिमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन) मार्गाने छोट्या गुंतवणुकीतून मोठा फंड तयार करण्याचा ट्रेंड वाढत आहे. SBI Mutual Fundच्या माध्यमातून फक्त ₹२५०० च्या गुंतवणुकीतून ₹१ कोटीचा फंड तयार करणे शक्य आहे.
SBI Healthcare Opportunity Fund
स्टेट बँक ऑफ इंडिया हेल्थकेअर अपॉर्च्युनिटी फंडाची काही वैशिष्ट्ये आपण आता पाहणार आहोत.
- परतावा : २५ वर्षांत १८% सरासरी
- फंडचे वय : २५ वर्षे
- सरासरी वार्षिक परतावा : १८%
- गेल्या वर्षीचा परतावा : ३७%
उदाहरण : जर १९९९ मध्ये या फंडमध्ये ₹२५०० ची गुंतवणूक केली असती, तर आज ती रक्कम १.१८ कोटी रुपये झाली असती.
लंपसम गुंतवणुकीवर मोठा फायदा
जर १९९९ मध्ये या फंडमध्ये १ लाख रुपये एकमुश्त गुंतवले असते, तर आज ती रक्कम ५५ लाख रुपये झाली असती.याचा अर्थ असा की, SIP व्यतिरिक्त एकमुश्त गुंतवणूक करणाऱ्यांनाही या फंडमधून मोठा नफा मिळू शकतो.
SBI म्युच्युअल फंडचे फायदे
चक्रवाढ व्याजाचा फायदा लहान गुंतवणुकीतून मोठा फंड तयार करणे शक्य.दीर्घकालीन गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवणे शक्य आहे. SIP मार्गाने गुंतवणूक करून नियमित बचत करणे शक्य.गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळवता येतो.इक्विटी, डेब्ट, हायब्रिड सारख्या विविध प्रकारच्या फंडमधून निवड करता येते.
SBI म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी?
- SBI म्युच्युअल फंडची अधिकृत वेबसाइट भेट द्या.
- SIP किंवा lumpsum गुंतवणुकीसाठी अर्ज भरा.
- KYC प्रक्रिया पूर्ण करा.
- गुंतवणुकीसाठी इच्छित फंड निवडा आणि गुंतवणूक सुरू करावी.
Period | Annualized Returns | Category Avg | Funds |
---|---|---|---|
1M | -2.52 | -3.64 | 27 |
3M | -2.02 | -4.33 | 24 |
6M | 7.62 | 0.87 | 23 |
1Y | 22.46 | 18.91 | 22 |
3Y | 23.05 | 18.87 | 15 |
5Y | 26.41 | 24.56 | 9 |
सूचना :- म्युच्युअल फंड आणि शेयर बाजारातील गुंतवणूक जोखीमच्या अधीन आहे.गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करा.गुंतवणुकीतून होणाऱ्या नफा-तोट्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मची जबाबदारी नाही.