Close Visit Mhshetkari

SBI Bank : आपले स्टेट बँकेत खाते आहे काय ? एसबीआय बँकेने घेतला कोट्यावधी ग्राहकांसंदर्भात मोठा निर्णय; बँकेमुळे कोट्यवधी खातेदार त्रस्त …

SBI Bank : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील एक अग्रगण्य बँक आहे. देशातील सरकारी नोकरदारापासून सामान्य जनतेपर्यंत लाखो लोकांचे खाते बँकेत आहे. आपल्याला माहितीच असेल की पेन्शन धारकांचे सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणावर बँक खाते असते बँकेकडून वेगवेगळ्या ऑनलाइन सुद्धा सुद्धा ग्राहकांना देण्यात येतात.

SBI Bank Yono Mobile App

ऑनलाईन बँकिंग नेट बँकिंग यूपीआय पेमेंट यासारख्या सुविधांचा समावेश बँकेकडून हे सर्व ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी Yono SBI Mobile App उपलब्ध करून देण्यात आले आहे,परंतु, बँकेची हीच ऑनलाईन ॲप सुविधा आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या बँकेचे कोट्यवधी खातेदार दुखावले आहेत.

मित्रांनो सध्या एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी असा नियम काढला आहे की सर्व ग्राहकांना ऑनलाइन ॲप वापरण्यासाठी नवीन मोबाईल घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. परिणामी कोट्यावधी ग्राहक त्रस्त असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या यूनो ॲपच्या वापराबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सध्या वाढत्या सायबर धोक्यामुळे सुरक्षितता लक्षात घेऊन एसबीआय ने युनो स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहे बँकेने म्हटले आहे की अँड्रॉइड 11 किंवा त्यापूर्वीची ऑपरेटिंग सिस्टीम चालवणाऱ्या स्मार्टफोन मध्ये युनो एसबीआय आता वापरता येणार नाही.

हे पण वाचा ~  Salokha Yojana : आनंदाची बातमी सलोखा योजनेची मिळाली मोठी मुदत वाढ; आता आपल्या मालमत्ते संदर्भात मोठा दिलासा ..

स्टेट बँक ऑफ इंडिया अपडेट्स

थोडक्यात एसबीआय चा वापर करण्यासाठी आपल्याला आपला मोबाईल अपडेट करणे आवश्यक आहे.

SBI Bank ने ग्राहकांना संदेशांद्वारे हा बदल कळवला आहे. ज्यामध्ये ग्राहकांचे डिवाइस अँड्रॉइड 12 किंवा त्यापूर्वीच्या वृत्तीवर अपडेट करण्यात देण्यात आले होते याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी ठेवण्यात आली होती. थोडक्यात १ मार्चपासून यूनो सेवा या जुन्या डिव्हाइसवर कार्य करणार नाहीत.

विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ने वित्तीय धोके टाळण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी व सूचना या संदेशाद्वारे केली होती. सुशिक्षित ज्येष्ठ नागरिक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वापर मोठ्या प्रमाणावर करतात.

घरबसल्या आर्थिक व्यवहार करता येत असल्यामुळे, त्याचा असंख्य ग्राहकांना फायदा मिळत होता. परंतु नवीन नियमामुळे आता ज्येष्ठ नागरिक व बँकेतील बऱ्याच ग्राहकांची तारांबळ उडालेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!