SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह सरकारी बँक आहे. देशभरातील विस्तृत शाखा जाळ्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लाखो ग्राहकांना बँकिंग सुविधा सहजतेने उपलब्ध होतात.
State Bank of India ने ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत,ज्यामध्ये कर्ज सुविधा, फिक्स्ड डिपॉझिट (एफडी), आणि झिरो बॅलन्स सेविंग अकाउंट यांचा समावेश आहे. आज आपण बँकेकडून मिळणाऱ्या विविध सुविधा विषयी सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
SBI Bank New Facility
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे सेविंग अकाउंट ग्राहकांसाठी विविध सुविधा आणि लाभ प्रदान करते. झिरो बॅलन्स सुविधा, मोफत बँकिंग सुविधा,आणि उच्च परतावा असलेल्या एफडी पर्यायांमुळे SBI Bank ही ग्राहकांची पहिली पसंत बनली आहे.
1) Bank Loan :- एसबीआय बँक ग्राहकांना होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन इत्यादी विविध प्रकारची कर्ज सुविधा पुरवते. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आर्थिक मदत मिळत असते.
2 ) Fix Deposit (एफडी) : एसबीआयमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून चांगल्या व्याजदराचा लाभ मिळतो.सदरील सुरक्षित गुंतवणूक पर्याय असून, ग्राहकांना नियमित आणि स्थिर उत्पन्न मिळविण्यास मदत होते.
3 ) Zero Balance Account : एसबीआयचे बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट (बीएसबीडीए) हा ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. सदरील खात्यामध्ये ग्राहकांना किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) राखण्याची आवश्यकता नसते. यामुळे ग्राहकांना कोणत्याही प्रकारची पेनल्टी भरावी लागत नाही.
4 ) Free Banking Facility : एसबीआयच्या सेविंग अकाउंटमध्ये मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, आणि NEFT/RTGS सारख्या सुविधा मोफत पुरवल्या जातात. ग्राहकांना दरमहा 4 वेळा मोफत रोख पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. खाते बंद करताना किंवा पुन्हा सक्रिय करताना कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
5) Checkbook Fees : सेविंग अकाउंट असलेल्या ग्राहकांना चेकबुकसाठी मात्र एक छोटे शुल्क भरावे लागते.
एसबीआय सेविंग अकाउंटचे इतर फायदे
- झिरो बॅलन्स सुविधा : खात्यात किमान शिल्लक राखण्याची गरज नसते.
- मोफत बँकिंग सुविधा : मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आणि इतर सुविधा मोफत.
- सुरक्षित आणि विश्वासार्ह : एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असल्याने ग्राहकांचे पैसे सुरक्षित असतात.