Close Visit Mhshetkari

Salary Slip : कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणकोणत्या भत्याचा समावेश असतो;पहा दरमहा कसी होते कपात होते ?

Salary Slip : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की, कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा घटक म्हणजे पगार होय.प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या या वेतन संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती असणे आवश्यक असते.तर बघूया या पगार पत्रकात असणाऱ्या विविध भत्ते व कपात संदर्भात सविस्तर माहिती

Employees Salary Slips

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असतो.पगारपत्रक (Salary Slip) हे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचे असते, कारण त्यात पगारासंबंधी सर्व माहिती असते.पगार पत्रकात अनेक घटक असतात,जसे की मूळ वेतन, विविध भत्ते, आणि पगारातून होणारी कपात. या लेखात आपण या घटकांची सविस्तर माहिती पाहणार आहे.

मूळ वेतन (Basic Pay) : हे कर्मचाऱ्याच्या वेतनश्रेणीनुसार ठरलेले वेतन असते.सातव्या वेतन आयोगानुसार, विविध वेतनश्रेणी (S-1, S-2, S-3 इ.) निश्चित केल्या आहेत.मूळ वेतनावरच इतर भत्ते अवलंबून असतात.

महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) : महागाई वाढल्यास, कर्मचाऱ्यांना दिला जाणारा भत्ता, हा मूळ वेतनाच्या टक्केवारीत दिले जाते. उदा. एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 41,100 रुपये असेल, आणि महागाई भत्ता 50% असेल, तर महागाई भत्ता 20,550 रुपये होईल.

घरभाडे भत्ता (House Rent Allowance – HRA) : कर्मचाऱ्याच्या राहण्याच्या खर्चासाठी दिला जाणारा भत्ता.हा देखील मूळ वेतनाच्या टक्केवारीत दिले जाते. उदा.5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सध्या 10% दराने HRA दिला जातो.

हे पण वाचा ~  Ladaki Bahin Yojana : "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित ! आता झाला ' हा' बदल ...

प्रवास भत्ता (Travel Allowance – TA) : कर्मचाऱ्याच्या प्रवासाच्या खर्चासाठी दिला जाणारा भत्ता होय. सातव्या वेतन आयोगानुसार, 25% महागाई भत्ता झाल्यास, 1,350 रुपये घरभाडे भत्ता मिळतो.

निव्वळ वेतन (Net Salary)

मित्रांनो, आपल्या एकूण वेतनातून सर्व कपात वजा केल्यावर शिल्लक राहणारी रक्कम म्हणजे निव्वळ वेतन होय.सदरील रक्कम कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.

पगारातून होणारी कपात

  • NPS/DCPS : मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 10% रक्कम या खात्यात जमा होते.
  • GPF : जुनी पेन्शन योजना लागू असल्यास, ठराविक रक्कम GPF खात्यात जमा होते.
  • गट विमा : दरमहा 360 रुपये कपात होते.
  • व्यवसाय कर : दरमहा 200 रुपये कपात होते.
  • आयकर (Income Tax) : आयकर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा कपात होते.
  • LIC हप्ते : कर्मचाऱ्यांचे LIC हप्ते कपातीमध्ये पाहायला मिळतात.
  • इतर कपात : पतसंस्था कर्ज, ठेवी, वर्गणी इत्यादी.

पगारपत्रक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराची आणि त्यातील विविध घटकांची सविस्तर माहिती मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!