Close Visit Mhshetkari

Salary Slip : कर्मचाऱ्यांच्या पगारात कोणकोणत्या भत्याचा समावेश असतो ? पहा दरमहा कोणती कपात होते ? पहा सविस्तर

Salary Slip : सरकारी कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा घटक म्हणजे पगार असतो. प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या या वेतन संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती असणे आवश्यक असते.तर पाहूया या पगार पत्रक पत्रकात असणाऱ्या विविध भत्ते व कपात संदर्भात सविस्तर माहिती ..

Employees Salary Slips

कर्मचाऱ्याच्या सॅलरी स्लीपमध्ये मुळवेतन, महागाई भत्ता,घरभाडे भत्ता,प्रवास सामावेश असतो. तसेच दरमहा होणारी कपात सुद्धा असते,यामध्ये व्यवसाय कर, गटविमा,एलआयसी, NPS ,Tax इ. घटकांच्या समावेश असतो. कर्मचाऱ्याला मिळणारे मिळणारे वेतन आणि होणारी कपात याचा ताळेबंद केल्यानंतर जे वेतन खात्यात जमा होते त्याला निव्वळ वेतन म्हणतात.

मूळ वेतन (Basic pay)

मूळ वेतन म्हणजे कर्मचाऱ्याला निश्चित केलेली वेतनश्रेणी मधून मिळणारे वेतन होय. सातव्या वेतन आयोगानुसार S-1 ,S-2, S-3,पासून विविध श्रेणी निश्चित केलेल्या असून त्यानुसार कर्मचाऱ्याचे वेतन आणि पुढील भत्ते अवलंबून असतात.

महागाई भत्ता (Dearness allowance) 

महागाई भत्ता म्हणजे DA मूळ वेतनावर महागाई नुसार मिळत असतो.बेसिक किंवा मूळ वेतन जेवढे असेल त्यावर महागाई भत्ता मिळतो. समजा बेसिक 41 हजार 100 आहे, तर 50 % दराने या मूळ वेतनावरती महागाई भत्ता 20550 रुपये मिळेल.

घरभाडे भत्ता (House Rent Allowance)

घर भाडे भत्ता म्हणजेच HRA सुद्धा मूळ वेतनावर अवलंबून असतो. सध्या 5 लाख लोकसंख्या पेक्षा कमी क्षेत्रात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना 8 % दराने HRA मिळत असतो तर माझा पगार मूळ वेतन 41 हजार 100 रुपये आहे तर मला 8 % दराने जवळपास 3288 रुपये घरभाडे भत्ता मिळेल.

हे पण वाचा ~  Rights Of An Employees : कर्मचारी म्हणून आपल्याला कोणकोणते अधिकार असतात ? पहा सविस्तर माहिती ...

प्रवास भत्ता (Travels Allowance) 

कर्मचाऱ्याच्या वेतनात मिळणाऱ्या प्रवास भाड्याचा समावेश असतो. सातव्या वेतन आयोगानुसार 25% महागाई भत्ता झाल्यानंतर 1350 रुपये प्रवास भाडे किंवा TA मिळत आहे.

Salary Slips Calculator

1) सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या दहा टक्के रक्कम NPS किंवा DCPS खात्यात जमा होते.याशिवाय जुनी पेन्शन योजना लागू असल्यास GPF खात्यात ठराविक रक्कम कर्मचारी कपात करत असतो.

2) कर्मचाऱ्याच्या वेतनातील कपातीचा विचार करायचा झाल्यास 360 रुपये गट विमा दरमहा कपात होत असतो. दरमहा व्यवसाय कर 200 रुपये कपात करावी लागते.

3) आयकर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा Income tax कपात करावी लागते.

4) कर्मचात्यांचे LIC हप्ते कपातीमध्ये पाहायला मिळतात.

5) याशिवाय बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या खाजगी पतसंस्था असतात, त्यांच्याकडून कर्ज आणि ठेवी, वर्गणी इत्यादींची कपात वेतनातून बघायला मिळते. 

थोडक्यात एकूण वेतन आणि कपात यांची वाजवट केल्यानंतर जो पगार शिल्लक राहून बँक खात्यावर जमा होतो,यालाच Net Salary असे म्हणतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!