Close Visit Mhshetkari

Salary Hike : ‘या’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ; पहा सरासरी किती होणार वाढ ?

Salary Hike : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीत असेल की एक एप्रिल 2025 पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच खालील संवर्गातील कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.आता आपण कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहात ? त्या क्षेत्राची स्थिती काय; यावर सरासरी पगार वाढ अवलंबून असते तर पाहूया सविस्तर.

Salary Hike in 2025

मित्रांनो मिळालेल्या रिपोर्टच्या आधारे 2025 मध्ये ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे सदरील सेक्टरमध्ये साधारणपणे दहा टक्के पेक्षा जास्त पगार वाढ होण्याची अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अहवालानुसार,डिजिटल कॉमर्सचा वेगाने होणारा विस्तार आणि ग्राहक खर्चात झालेली वाढ यामुळे सदरील क्षेत्रात कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. याशिवाय आणखी काही क्षेत्रात चांगली पगारवाढ होण्याची अपेक्षा आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रचंड मागणी असा कंपनी त्यांच्या पगारात सर्वाधिक वाढ करणार आहे. अहवालानुसार 2025 मध्ये सरासरी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन 9.4% वाढणार असल्याचा अंदाज असून वेतन वाढीमध्ये थोडीशी मंदी दर्शविण्यात येत आहे.

ऑटोमोटिव्ह, फार्मास्युटिकल्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि वित्तीय सेवा यासारख्या इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये चांगली वेतनवाढ होण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. मित्रांनो सदरील क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची गुंतवणूक होत राहते ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताची स्थिती मजबूत होणार आहे. पगारवाढीमध्ये थोडीशी गट जरी होणार असली तरी स्पर्धात्मक आणि कंपन्याची प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहेत.

हे पण वाचा ~  Arrears Bills : आता या कर्मचाऱ्यांच्या सन 2024-25 थकीत वेतन देयके ऑनलाईन सादर करणे संदर्भात महत्वाचे परिपत्रक निर्गमित ...

या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची वाढती मागणी !

बऱ्याच कंपन्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासह कल्याणकारी कार्यक्रमांना प्राधान्य देत आहे. यामुळेच सदरील क्षेत्रातील कंपन्या सुद्धा कर्मचारी वर्गाच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते लवचिक आणि सर्वसमावेशक लाभ देखील वाढवत आहेत.

सध्या जगभरात कुशल व्यावसायकांची तीव्र कमतरता जाणवत आहे आज कंपन्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे कुशल व्यावसायिकाची कमतरता होय. सन 2023 मध्ये 18.3% वरून 2024 मध्ये 17.5% पर्यंत रोजगारात घट होऊन देखील 80 टक्के कंपन्या कुशल कारागिरांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या शोधात धडपडत असल्याचे आवाजावरून दिसून येत आहे.

विशेषतः आयटी आणि ऊर्जा यासारख्या उच्च मागणी असलेल्या उद्योगांमध्ये सदरील समस्या जास्त आहे. सदरील समस्येचे निराकरण करण्यासाठी, कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अपस्किलिंग आणि रीस्किलिंगवर भर देताना दिसत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!