Salary Hike : वित्त विभागाच्या उपरोक्त वाचा क्र.१ येथील दि.१३.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवालाच्या खंड-२ मधील वेतनश्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारशींच्या स्विकृतीबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
Goverment Employee salary Hike
राज्य वेतन सुधारणा समितीने केलेली शिफारस शासनाने मान्य करुन ज्या संवगांना सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहेत, अशा संवर्गाची माहिती सदर शासन निर्णयांन्वये नमूद केली आहे. उपरोक्त दि.१३.२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील “विवरणपत्र-अ” अन्वये सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील लघुलेखक (उच्चश्रेणी) व लघुलेखक (निम्नश्रेणी) या संवर्गाचे वेतनस्तर सुधारित करण्यात आले आहेत.
कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी उपरोक्त वाचा क्र.२ व ३ अन्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील आस्थापनेवरील शासन मान्य लघुलेखक (उच्चश्रेणी) व लघुलेखक (निम्नश्रेणी) या संवर्गातील पदांना सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
वित्त विभाग, शासन निर्णय क्र. वेपुर ११२१/प्र.क्र.४/सेवा-९, दि.१३.२.२०२३ अन्वये मंजूर करण्यात आलेला सुधारित वेतनस्तर (विवरणपत्र-अ) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील आस्थापनेवरील लघुलेखक (उच्चश्रेणी) व लघुलेखक (निम्नश्रेणी) या संवर्गातील शासन मान्य पदांना सोबतच्या विवरणपत्र-अ मध्ये दर्शविल्यानुसार लागू करण्यात आली आहे.
सुधारित वेतनस्तर लागू
सुधारित वेतनस्तर लागू करताना वाचा क्र.१ येथील शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती उपरोक्त संवर्गाना लागू राहतील.सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३६/२०२५/सेवा-९, दि.२०.२.२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेने व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३१०१२०३५३९०१३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.