Close Visit Mhshetkari

Retirement Plan रिटायरमेंटनंतर पेन्शनचं टेन्शन दूर करतील या ५ स्कीम्स, घरबसल्या महिन्याला होईल कमाई; कोणत्या आहेत स्कीम्स?

Retirement Plan : दरमहा पेन्शन मिळाली तर छोट्या-छोट्या गरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत नाही. आजकाल अशा अनेक योजना आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वृद्धापकाळात स्वतःसाठी पेन्शनची सहज व्यवस्था करू शकता. या लेखात आपण अशाच ५ योजनांवर एक नजर टाकू.

१. ईपीएफओ (EPFO) पेन्शन स्कीम

खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी दरमहा ईपीएफओमध्ये योगदान देतात. कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही ईपीएफओमध्ये योगदान देतात.यातील काही भाग निवृत्ती निधीत जातो, तर काही भाग ईपीएस (एम्प्लॉई पेन्शन स्कीम) मध्ये जातो. ईपीएसच्या माध्यमातून वृद्धापकाळावर दरमहा पेन्शन दिली जाते. जर तुम्ही सलग किमान १० वर्षे ईपीएसमध्ये योगदान दिले असेल, तर तुम्ही ईपीएफओकडून पेन्शन घेण्यास पात्र आहात. हे पेन्शन निवृत्तीच्या वयात उपलब्ध असते आणि तुमच्या योगदानाच्या रकमेवर अवलंबून असते.

२.अटल पेन्शन योजना (APY)

अटल पेन्शन योजना ही करदाते नसलेल्यांसाठी आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० वर्षे असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत दरमहा योगदान द्यावे लागते. वयाच्या ६० व्या वर्षानंतर तुम्हाला १,००० ते ५,००० रुपये दरमहा पेन्शन मिळू शकते. तुम्हाला किती पेन्शन हवे आहे, त्यानुसार तुमच्या योगदानाची रक्कम ठरवली जाते.

३.नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS)

नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) ही सरकारी आणि खाजगी नोकरीत असलेल्यांसाठी एक उत्तम पेन्शन योजना आहे. ही योजना निवृत्ती निधीसह पेन्शनची व्यवस्था करते. एनपीएस ही मार्केट-लिंक्ड स्कीम आहे, त्यामुळे त्याचा परतावा बाजारावर अवलंबून असतो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना चांगला परतावा देऊ शकते. या योजनेत ६०% रक्कम निवृत्तीनंतर मिळते, तर ४०% रक्कम अॅन्युइटी म्हणून वापरली जाते. अॅन्युइटीची रक्कम जितकी जास्त असेल, तितकी पेन्शन जास्त मिळते.

हे पण वाचा ~  NPS Update : राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमच्या नियमात 1 एप्रिलपासून मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर
४.सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (SWP)

सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन (एसडब्ल्यूपी) ही एक गुंतवणूक योजना आहे, ज्यातून तुम्हाला म्युच्युअल फंड योजनेतून दरमहा ठराविक रक्कम मिळते. या योजनेद्वारे वृद्धापकाळावर चांगल्या पेन्शनची व्यवस्था करता येते. यासाठी तुम्हाला आधी एसआयपी किंवा इतर योजनेद्वारे मोठा निधी जमा करावा लागतो. निवृत्तीनंतर तुम्ही एसडब्ल्यूपीचा पर्याय निवडू शकता. या योजनेतून मिळणारी रक्कम म्युच्युअल फंड युनिट्सच्या विक्रीतून मिळते. निधी संपल्यास एसडब्ल्यूपी बंद होते.

५. व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (VPF)

व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) ही ईपीएफओच्या समांतर असलेली योजना आहे. या योजनेत तुम्ही ईपीएफपेक्षा जास्त रक्कम गुंतवू शकता. या योजनेचा फायदा असा आहे की, त्यावर मिळणारे व्याज ईपीएफप्रमाणेच करमुक्त आहे. निवृत्तीनंतर तुम्हाला एकाच वेळी ही रक्कम मिळते, ज्याचा वापर तुम्ही पेन्शन योजनेसाठी करू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!