Retirement Benefits : सेवा निवृत्तीला 1 वर्ष बाकी आहे काय ? मग ‘ही’ कामे लगेच करा; अन्यथा पेन्शन ते ग्रॅच्युइटीपर्यंत येईल अडचण

Retirement Benefits : नमस्कार मित्रांनो,आपण जर सरकारी नोकरीला असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. सेवानिवृत्तीसाठी आपल्याला जर एक वर्ष बाकी असेल तर आपल्या साठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

State Employees Retirement Benefits

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग पेन्शन आणि ग्रॅच्युइचे व्यवस्थापन करते.निवृत्तीवेतन लाभांचे वेळेवर वितरण आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवर ग्रॅच्युइटी संदर्भात अनेक अपडेट्स या विभागामार्फत दिल्या जातात.
सरकारी गृहनिर्माण मंजुरी (नियम ५५) आपण जर सरकारी निवासस्थानास वास्तव्य असाल तर आपल्याला निवृत्तीच्या किमान एक वर्ष अगोदर निवासस्थानाच्या स्थितीची संपूर्ण माहिती प्रशासनाला द्यावी लागते.
आपण राहत असलेल्या निवासस्थाना संदर्भात तपशील नो डिमांड सर्टिफिकेट (NDC) जारी करण्यासाठी इस्टेट डायरेक्टोरेटकडे पाठवले जातात. सदरील प्रमाणपत्र निवृत्तीच्या ८ महिने आधी मिळणे आवश्यक आहे. थोडक्यात आपल्याकडे सरकारी निवासस्थानी संदर्भित कोणतीही थकबाकी नसल्यासंदर्भात हे प्रमाणपत्र असते.
सेवा अभिलेखांची पडताळणी आणि सुधारणा (नियम ५६ आणि ५७)सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा रेकॉर्डचा सर्वसमावेशक आढावा निवृत्तीच्या एक वर्ष आधी घेतला जातो. पेन्शन प्रकरणाचे सादरीकरण आपल्याला या आधारे करावे लागते आपल्या विभाग प्रमुखाला संपूर्ण पेन्शन केस फॉरमॅट १० मधील कव्हरिंग लेटरसह वेतन आणि लेखा कार्यालयाकडे पाठवावी लागते. निवृत्त कर्मचाऱ्याकडून पेन्शन फॉर्म मिळाल्यानंतर जवळपास २ महिन्यांच्या आत हे केले पाहिजे.
पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) जारी करणे, पेन्शन प्रकरण प्राप्त झाल्यानंतर, लेखाधिकारी आवश्यक पडताळणी आणि तपासण्या पार पाडण्यासाठी प्रक्रियेचे पालन करतात.निवृत्ती वेतन पेमेंट आदेश मिळाल्यापासून साधारणपणे 21 दिवसाच्या आत CPA पेन्शन पेमेंट ऑर्डरची प्रत जारी करते. सदरील आदेश वितरण प्राधिकरणाकडे पाठवले जाऊन निवृत्तीनंतर तुम्हाला कसल्या कटकटीशिवाय पेन्शचा लाभ घेता येईल.

हे पण वाचा ~  State Employees GR : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे 5 शासन निर्णय निर्गमित! पगारवाढ,जुनी पेन्शन,ग्रॅच्युइटी आणि अनुकंपा संदर्भात मोठे निर्णय ..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!