Reliance Scholarship : रिलायन्स स्कॉलरशिप साठी ऑनलाईन अर्ज सुरू; पाच हजार विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाख रुपये!

Reliance  Scholarship : आर्थिक परिस्थिती हालाकिची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धीरूभाई अंबानी यांच्या स्मरणार्थ मुकेश अंबानी यांनी मागील वर्षी विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप योजना सुरू केलेली आहे या द्वारे विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात येते. यासंदर्भात पात्रता निकष ऑनलाइन अर्ज याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

Reliance Foundation Scholarship

रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिपसाठी देशातील प्रत्येक राज्यांतील विद्यार्थी अर्ज करू शकतात.ही शिष्यवृत्ती अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसपूर्वी विद्यार्थ्यांसाठी आहेत. कोणत्याही स्ट्रीममध्ये, कोणत्याही कोर्सेसच्या विद्यार्थ्यांकडे अर्ज करता येईल. यासाठी ते यूजी फर्स्ट इयरसमध्ये असणे गरजेचे आहे.

सदरील स्कॉलरशिप ५००० विद्यार्थ्यांना दिली जाईल.शिष्यवृत्ती निवडीची प्रक्रिया १२ चे मार्कशीट्स,ॲप्टिट्यूड टेस्ट रिझल्ट, कुटुंबाचे उत्पन्न यांवर अवलंबून आहे.स्कॉलरशिप निवड झाल्यावर विद्यार्थ्याची २ लाखांपर्यतची आर्थिक मदत दिली जाते.

रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्ती – अर्ज

रिलायन्स शिष्यवृत्तीसाठी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. यासाठी आपल्याला रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यासाठी scholarships.reliancefoundation.org. या लिंकवर अर्ज करावा लागेल. याशिवाय कोणत्याही पद्धतीने अर्ज करता येणार नाही.

सदरील स्कॉलरशिप साठी अर्ज करण्यासाठी लिंक ओपन झाली असून जे विद्यार्थी यासाठी अर्ज करू इच्छितात, त्यांना या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२३ आहे.

रिलायन्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीसाठी येथे अर्ज करा – Reliance Scholarship

Leave a Comment

error: Don't Copy!!