Provident Fund : PF सदस्यांसाठी आनंदाची बातमी … आता एक लाख नव्हे तर पाच लाखांपर्यंत होणार सेटलमेंट …

Provident Fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) सदस्य असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी गरजेनुसार सुरू करण्यात आलेल्या ऑटो सेटलमेंट ची मर्यादा वाढवण्यात आली आहे;तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर …

Provident Fund New Update

ईपीएफओच्या जवळपास 7.5 कोटी सदस्यांना सदरील अपडेटचा फायदा होणार आहे.श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या कार्यकारी समितीच्या 113 व्या बैठकीत सदरील निर्णय घेण्यात आला आहे.

EPFO संघटनेच्या निर्णयानंतर सदस्यांना ऑटो सेटलमेंट ऑफ एडवान्स क्लेम च्या माध्यमातून 5 लाखांपर्यंतचा “Prudent Fund” काढू शकतात.

मित्रांनो,एडवान्स क्लेम सर्वात आधी कोरोना काळात 2020 मध्ये सुरु करण्यात आला होता. त्यावेळी त्याची मर्यादा 50 हजार रुपये तर मे 2024 ईपीएफओने ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेऊन 50 हजार रुपयांची असलेली मर्यादा वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली होती. आता ही मर्यादा 1 लाखावरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

या कारणांसाठीही मिळतात पैसे

भविष्य निर्वाह निधी संघटने कडून नव्याने अग्रीम रक्कमेचा 3 कारणासाठी ऑटो सेटलमेंट सुरु केला आहे. शिक्षण, लग्न आणि घरासाठी ऑटो मोड सेटलमेंट करता येते.

हे पण वाचा ~  Provident Fund : PPF, EPF, NPS आणि GPF यामध्ये काय फरक आहे? जाणून घेऊया भविष्य निर्वाह निधी (PF) योजनांची सविस्तर माहिती ...

मित्रांनो, यापूर्वी चे सदस्य असलेल्या ग्राहकांना आजारपण आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच पीएफ ऑटोमॅटिक क्लेम करता येत होता जो 3 दिवसात सेटल करण्यात येत होता.

सद्या 95 % क्लेम ऑटो सेटलमेंट होत आहेत.EPFO ने चालू आर्थिक वर्षात 6 मार्च 2025 पर्यंत 2.16 कोटी रुपयांची ऑटो क्लेम सेटलमेंट केलेले आहेत.सन 2023-24 मध्ये 89.52 लाख रुपये ऑटो क्लेम सेटलमेंट करण्यात आले होते.

क्लेम नाकारण्यात आलेल्या दाव्यांची टक्केवारी 50% वरून 30 टक्के वर आलेली आहे काढण्यासाठी पडताळणीची औपचारिकता देखील 27% वरून 18% वर करण्यात आली आहे सदरील बैठकीत ही मर्यादा 6% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!