Provident Fund : पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करून मिळवा दरमहा 60 हजार रुपये पेन्शन; पहा सोपे गणित

Provident Fund : नमस्कार मित्रांनो,आपण जर सुरक्षित आणि खात्रीशीर उत्पन्नाच्या शोधात असाल तर आपल्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) खूप फायदेशीर ठरू शकतो. सदरील योजनेत गुंतवणूक करून आपण निवृत्तीनंतर दरमहा ६० हजार रुपयांच्या नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.

Provident Fund investment tips

PPF मध्ये आपण एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकतो.सध्या या योजनेवर ७.१ % व्याज मिळत असून हे व्याज कंपाउंडिंग तत्त्वावर वाढते. पीपीएफचा मॅच्युरिटी पीरियड १५ वर्षांचा आहे, आपण जर ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोन वेळेस तो वाढवावा आणि गुंतवणूक सुरू ठेवावी थोडक्यात आपल्याला २५ वर्षे वार्षिक १.५ लाख रुपयांची गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल.

१५ वर्षांत १ कोटींचा निधी

पीपीएफमध्ये २५ वर्षे सलग १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक ३७ लाख ५० हजार रुपये होईल आणि तुम्हाला ७.१ % दरानं ६५ लाख ५८,ल हजार ०१५ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुमच्या पीपीएफ खात्यात एकूण १ कोटी ०३ लाख ०८ हजार ०१५ रुपये जमा होतील.

दरमहा ६० हजारांचे उत्पन्न

जर तुम्ही संपूर्ण १ कोटी ०३ लाख ०८ हजार ०१५ रुपये खात्यात तसेच ठेवले तर ७.१% दराने व्याजातून ७ लाख ३१ हजार ८६९ रुपये वार्षिक व्याज मिळेल. आता आपण ही व्याजाची रक्कम वार्षिकच काढू शकता. जर १२ महिन्यांनुसार ७ लाख ३१ हजार ८६९ रुपयांचा हिशोब केल्या तर दरमहा ६० हजार ९८९ रुपये येतील. थोडक्यात दरमहा ६०,९८९ रुपयाच्या उत्पन्नाची व्यवस्था आपण करू शकता. विशेष म्हणजे आपले आपल्या अकाउंट मध्ये १ कोटी ०३ लाख ०८ हजार ०१५ रुपयांचा निधीही शिल्लक राहणार आहे.

हे पण वाचा ~  Airtel FD Scheme : आता Airtel सुरू केली FD स्कीम ? बँकांपेक्षा मिळणार अधिक व्याजदर; घरबसल्या सुरू करा फिक्स डिपॉझिट !

मित्रांनो पीपीएफ खात्याचे योगदान दर पाच वर्षाच्या ब्लॉकिंग कालावधीत वाढवता येते. भारतातील कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आपल्याला पीपीएफ अकाउंट उघडता येते मॅच्युरिटीच्या तारखेपासून एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आपल्याला अर्ज सादर करावा लागतो पीएफ खात्यात 25 वर्षे योगदान देण्यास नक्की प्रयत्न करावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!