Provident fund : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) जवळपास 7 कोटी सदस्यांशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे.भविष्य निर्वाह निधी संघटनेची संदर्भित ग्राहकांसाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Provident Fund Interest Rate
मित्रांनो, उद्या म्हणजेच शुक्रवारी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. वास्तविक, EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची म्हणजेच CBT बोर्डाची बैठक होणार असून ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२५ साठी EPF Interest Rate मूल्यांकन केले जाणार आहे. सदरील बैठकीत ठेवींच्या व्याजदरात कपात करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे.
शेअर मार्केटमधील घसरण आणि बॉण्ड यील्डतसेच जास्त क्लेम सेटलमेंट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. Economic Times ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मागील वर्षी व्याजदर ८.१५ टक्क्यांवरून ८.२५ टक्के केला होता.
भविष्य निर्वाह निधी व्याजदर क होणार?
मित्रांनो मागील आठवड्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या गुंतवणूक व लेखा समितीने संस्थेच्या उत्पन्न व खर्चाच्या आढावा बैठकीत काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामोर येत आहे.
आता शुक्रवारी होणाऱ्या सीबीटीच्या बैठकीत व्याजदरांचा विचार केला जाणार आहे. सीबीटीनंही व्याजदरात कपात करण्याच्या शिफारशीचे समर्थन केल्यास कोट्यवधी EPF ग्राहकांना मोठा धक्का बसू शकतो.
EPF Interest Rate
- २०२३-२४ मध्ये रुपयांच्या उत्पन्नावर सभासदांना ८.२५% व्याजदर
२०२२-२३ मध्ये सभासदांना ८.१५% व्याज दर देण्यात होते. - भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ग्राहकांना सर्वाधिक व्याज दर १९८९-९० मध्ये देण्यात आले होते या कालावधीत Epfo १२ % परतावा दिला होता.
फंड रिझर्व्ह करण्याच्या तयारीत
ईपीएफओने आपल्या सभासदांना दरवर्षी फ्लॅट व्याजदर देण्यासाठी राखीव निधी तयार करण्याची योजना आखत आहे. दरवर्षी सभासदांना मिळणाऱ्या व्याजदराने शेअर बाजार आणि गुंतवणुकीच्या साधनांमधील चढ-उतारांचे रक्षण व्हावे असा यामागचा उद्देश आहे.