Close Visit Mhshetkari

Provident Fund : आता ATM मधून काढता येणार PF चे पैसे; पहा EPFO ची नवीन योजना; ‘पीएफ’साठी स्वतंत्र एटीएम कार्ड 

Provident Fund : नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाच्या निम्मत्वाची बातमी समोर आलेली आहे. भविष्य निर्वाह निधी संघटन संदर्भात सदरील निर्णय सरकारकडून घेण्यात येणार आहे.सरकारचा EPFO 3.0 उपक्रमांतर्गत EPFO सदस्यांसाठी सेवा वाढविण्याचा उद्देश आहे. 

Provident Fund New Update

मित्रांनो, मिळालेल्या रिपोर्टनुसार सदरील योजनेत एक महत्वपूर्ण बदल करण्यात येणार असून केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मध्ये योगदान वाढवण्याचा त्याचबरोबर डेबिट कार्ड सारखे एटीएम कार्ड जारी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

सदरील निर्णयामुळे ईपीएफओ चे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना भविष्यात थेट ‘एटीएम’मधून पैसे काढता येतील.सदरील योजना मे-जून 2025 पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे.

आपल्याला माहिती असेल की EPF सदस्यांना पीएफ मधून पैसे काढण्यासाठी साधारणपणे 7 ते 10 दिवसापर्यंत वाट पाहावी लागते EPFO पैसे काढण्याची कारवाई पूर्ण केल्यानंतर कागदपत्रे सादर केल्यानंतर पैसे काढण्याचा मार्ग मोकळा होतो ज्यामुळे मोठा वेळ वाया जातो.

ईपीएफओ चा सदस्य असलेला कर्मचारी आपल्या पगारातून 12 टक्के कपात करतो, त्यांच्या EPF खात्यासाठी योगदान देतात. दरम्यान, नियोक्ता ३.६७ टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतात. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) वितरीत केली जाते.नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) खात्यात 0.50 % योगदान देखील देतो.

हे पण वाचा ~  UPS Scheme : युनिफाईड पेन्शन स्कीम गॅजेट अधिसूचना जारी! 50% पेन्शन च्या नावाने पुन्हा कर्मचाऱ्यांची घोर निराशा...

पेन्शनच्या रकमेवर काय होईल परिणाम ?

सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफ योगदानावरील मर्यादा काढून टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सदरील बदलाचा पेन्शनच्या रकमेवर कोणताही परिणाम होणार नाही, कारण पेन्शनचे योगदानदेखील 8.33% एवढे स्थिर राहील. जर का सरकारने PF कपातीसाठी वेतन मर्यादा वाढवली तरच पेन्शन रकमेत वाढ होईल. सध्या 15 हजार रुपये आहे. केंद्र सरकार ही मर्यादा १५ हजार रुपयांवरून 21 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!