Provident fund : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की,पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी गुंतवणूक योजना असून केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. सदरील योजनेत पैसे गुंतवल्यानंतर पैसे सुरक्षित असतात.सध्या, पीपीएफ वार्षिक 7.1 % दराने व्याज देत आहे.
Public Provident Fund
सध्या भारतीय शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण दिसून येत असताना बाजारातील सततच्या घसरनुकीमुळे केवळ शहर गुंतवून दारच नाहीतर म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओही उद्ध्वस्त होत आहेत.
शेअर बाजारातील अनिश्चिततेमुळे बाजारात नवीन आहेत आणि जुन्या सुद्धा गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे मित्रांनो आपल्याला शेअर बाजारातील मोठ्या जोखमीपासून दूर राहायचे असेल तर आपण निश्चितपणे Public Provident fund (PPF) योजनेत गुंतवणूक करावी.
PPF Return Calculator
पीपीएफ योजना 15 वर्षांत मॅच्युअर होते.जर तुम्ही या योजनेत दरवर्षी 1 लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला हमीसह एकूण 27 लाख 12 हजार 139 रुपये मिळतील. आपल्या 15 लाख कृपयाच्या गुंतवणुकीवर आपल्याला 12 लाख 12 हजार 139 रुपयांचे निश्चित व्याज मिळेल.
सदरील सरकारी योजनेत देशातील कोणताही नागरिक खाते उघडू शकतो. आपण आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने पीपीएफमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. लक्षात ठेवा की एका व्यक्तीच्या नावावर फक्त एकच PPF Account उघडता येते.