Property Documents : नमस्कार मित्रांनो, मालमत्ते संदर्भात अनेक लोक सतर्क राहतात कारण जमीन आणि मालमत्तेचे अनेक वाद आपल्याला आता होताना दिसत आहे.त्यामुळे प्रॉपर्टीची संबंधित कागदपत्रे (Property Documents) काळजीपूर्वक सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे.
How to Recive Duplicate Property Papers
मित्रांनो,बरेच लोक आपल्या मालमत्तेची कागदपत्रे बँकेच्या लॉकर्स मध्ये ठेवतात तर काही लोक घरी सुरक्षित ठेवतात.कलांतराने आपण ठेवलेले मालमत्ता चे कागदपत्र सापडत नाही. जर आपले मालमत्तेचे कागदपत्र हरवले असेल, तर काळजी करू नका आपण खालील पद्धतीने ही कागदपत्रे परत मिळू शकतो.
1. सर्वप्रथम FIR नोंदवा :- मित्रांनो, जर आपल्या मालमत्तेची संदर्भात कागदपत्र हरवले असल्यास आपण सर्वप्रथम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार म्हणजेच (FIR) नोंदवावा.
आपल्याला स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये या फराळ नोंदवायचा नसेल तर आपण ऑनलाइन पद्धतीने सुद्धा नोंदणी करू शकतो पोलीस या कागदपत्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील जर पोलीस आपले कागदपत्रे शोधून देण्यास असमर्थ झाले आपल्याला नॉन-ट्रेसेबल सर्टिफिकेट (Non-Traceable Certificate) दिले जाईल. हे प्रमाणपत्र तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असेल.
2. वृत्तपत्रात जाहिरात देणे : मित्रांनो आपल्याला जर आपले कागदपत्र पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मिळाले नाही तर दुसरा टप्पा म्हणजे आपण आपल्या हरवलेल्या कागदपत्रासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरात देणे होय. जाहिरात देताना आपण आपल्या मालमत्त्याची संदर्भात माहिती द्यावी जसे की मालमत्तेचे स्थान नोंदणी क्रमांक कागदपत्रे झाल्याचा तपशील इत्यादी. जाहिरात जी संपूर्ण माहिती दोन जर कोणाला आपली कागदपत्र मिळाले असतील तर ते आपल्याला परत द्यावेत असे आवाहन करावे साधारणपणे पंधरा दिवसाची प्रत्यक्ष केल्यानंतर जर कागदपत्र मिळाले नाही तर पुढील टप्प्यावर आपण जावे.
3. सब-रजिस्ट्रार ऑफिसमध्ये अर्ज : मित्रांनो, वरील दोन्ही टप्प्यांमध्ये आपल्याला कागदपत्र मिळाले नाही तर आपण आपल्या मालमत्तेच्या सब-रजिस्ट्रार ऑफिसमध्ये डुप्लिकेट कागदपत्रांसाठी अर्ज करावा.
Property Duplicate Documents
अर्जासोबत पुढील दस्तऐवज संलग्न करावे लागतात.
- FIR ची प्रत
- नॉन-ट्रेसेबल सर्टिफिकेट
- वृत्तपत्रातील जाहिरातीची प्रत
- आपण आपल्या मालमत्तेच्या दुय्यम प्रतीच्या कागदपत्रांच्या मागणीसाठी अर्जासोबत आवश्यक शुल्क भरावा.
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः १५ ते २० दिवसांत तुमचे डुप्लिकेट प्रॉपर्टी कागदपत्र (Duplicate Property Papers) जारी केले जातील. मित्रांनो, प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स प्रत किंवा डिजिटली स्कॅन करून ठेवा.
- भविष्यातील वाद आणि अडचणी टाळण्यासाठी हे कागदपत्र सुरक्षित ठेवा.