Close Visit Mhshetkari

Professional Tax : आनंदाची बातमी … आता “या” कर्मचाऱ्यांना मिळणार दरमहा कपात होणाऱ्या व्यवसाय करात सूट! वेतनात 2500 रुपये ….

Professional Tax : मनोजकुमार रा. येडगे व्यवसाय कर अधिकारी केओएल-पीटीओ-सी-००२. कोल्हापूर यांच्याकडून प्रशासनाभिकारी, प्राथ.शिक्षण समिती, महानगरपालिका कोल्हापूर यांना कर्मचाऱ्यांच्या तसेच व्यावसायिकांच्या व्यवसाय कर संदर्भात एक अत्यंत मत पूर्ण परिपत्रक पाठवण्यात आले आहे.

ज्यामध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०६/०४/२०२३ चा संदर्भ देण्यात आला आहे.तर व्यवसाय कर संदर्भात काय आहे नवीन अपडेट पाहूया सविस्तर …

Professional Tax Benefits

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की व्यवसाय कर म्हणजेच प्रोफेशन टॅक्स हा भारतातील राज्य सरकारांद्वारे आकारलेला आणि गोळा केलेला कर असतो.आपल्या पगारातून उत्पन्न मिळवणारी व्यक्ती किंवा चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाऊंटंट, सॉफ्टवेअर इंजिनिअर, वकील, डॉक्टर इत्यादी व्यवसाय करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हा व्यावसायिक कर भरावा लागतो.

महाराष्ट्र राज्य व्यवसाय,व्यापार,आजीविका व नोकऱ्या यांवरील कर अधिनियम, १९७५ मुख्य अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची मध्ये एक बदल करण्यात आलेला सदरील बदलामुळे महिला कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.

मित्रांनो,ज्या महिला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 25 हजार रुपये पेक्षा अधिक नसेल,अशा महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून व्यवसाय कर कपात होणार नाही.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जवळपास 2500 रुपये “व्यवसाय कर” म्हणून वसूल करण्यात येतो. ज्यामध्ये वर्षभर दरमहा 200 रुपये तर्फ फेब्रुवारी महिन्यात 300 रुपये असा एकूण 2500 रुपये कपातीचा समावेश असतो.

हे पण वाचा ~  Gratuity Rule 2025 : बापरे …… तर "या" कर्मचाऱ्यांना मिळणार नाही ग्रॅच्युइटी; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय !

आता बऱ्याच महिला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 25 हजार रुपये पेक्षा कमी असेल, यांना व्यवसाय कर कपातीपासून सुट मिळणार आहे. थोडक्यात राज्यात कार्यरत असलेल्या ग्रामसेवक शिक्षण सेवक कृषी सेवक व संवर्ग ड मधील बऱ्याच कर्मचाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don't Copy!!