Close Visit Mhshetkari

Post office Recruitment : पोस्ट ऑफिस मध्ये दहावी पास उमेदवारासाठी तब्बल 21,413 जागांची भरती; असा करा ऑनलाईन अर्ज 

Post office Recruitment : पोस्ट पदभरती 2025 सुरु झालेली असून इयत्ता 10 वी च्या गुणांच्या आधारे भारतीय डाक विभागात विविध 21,413 पदांसाठी पदभरती निवड करण्यात येणार आहे.पात्र अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.Post office GDS साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? या संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती.

Post office GDS Recruitment Maharashtra

भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे.भरती अंतर्गत एकूण 21,413 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 फेब्रुवारी 2025 पासून अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2025 निश्चित करण्यात आली आहे.

शुल्क :- पोस्ट पदभरती 2025 परीक्षेसाठी अर्जदार महिला असेल किंवा अनुसूचित जाती जमाती किंवा अपंग असले तर अशा अर्जदारांना कोणतेही शुल्क नाही. खुल्या प्रवर्गातील आहेत किंवा इतर मागासवर्गीय OBC आहेत अशा अर्जदारांना मात्र 100 परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

वय :- अर्जदाराचे वय 10 ते 40 दरम्यान असावे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

बऱ्याचदा ऑनलाईन अर्ज सादर कसा करावा लागतो किंवा ऑनलाईन अर्ज सादर करतांना कोणकोणते कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करावी लागतात या संदर्भात अर्जदाराला माहिती नसण्याची शक्यता असते.

हे पण वाचा ~  State Employees :- सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या ! दुसरी आणि सहावी मागणी मान्य होणार? अर्थसंकल्पापूर्वी होणार मोठी घोषणा..

ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत लिंक ➡️ पोस्ट पदभरती 2025

  • सर्वात आधी, भारतीय पोस्ट विभागाच्या https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाइटच्या मुख्य पानावर,”नोंदणी” (Registration) या पर्यायावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती भरून तुमची नोंदणी पूर्ण करा.
  • नोंदणी झाल्यानंतर, “ऑनलाईन अर्ज करा” (Apply Online) या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज प्रक्रियेतील सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.

ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी मध्ये चांगले गुण मिळालेले असतील,अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 thoughts on “Post office Recruitment : पोस्ट ऑफिस मध्ये दहावी पास उमेदवारासाठी तब्बल 21,413 जागांची भरती; असा करा ऑनलाईन अर्ज ”

error: Don't Copy!!