PF Investment : नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की पीएफ गुंतवणूक ची गणना दर दर महिन्याच्या पाच तारखेला घेतले होते जर या तारखेपर्यंत आपण गुंतवणूक केली नाही तर आपल्याला व्याज संपूर्ण महिन्याचे मिळत नसते. थोडक्यात या तारखेपर्यंत आपली गुंतवणूक पूर्ण केली तर त्याला संपूर्ण महिन्याचे व्याज मिळते.
PF Investment Tips
मित्रांनो दीर्घकालीन गुंतवणुकीचा खरा फायदा हा चक्रवाढ व्याजातून मिळत असतो सुरक्षित गुंतवणूक म्हटलं तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF चांगला पर्याय मानला जातो. जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे.
पीएफ फंडात पैसे जमा केल्या नंतर पाच तारखेपर्यंत सदरील रक्कम वर्ग होणे आवश्यक असते मासिक गुंतवणूक जर पाच एप्रिल पूर्ण केली तर आपल्याला संपूर्ण महिन्याचे व्याज मिळत असते. आपल्याला पीएफ फंडात पैसे गुंतवणूक करण्याची ५ एप्रिल २०२५ तारीख का महत्त्वाची आहे, या मागील गणित जाणून घेऊया.
PPF मध्ये पैसे गुंतवल्यानंतर आपल्याला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. आपण मासिक गुंतवणूक करत असाल तर, महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे जमा करा, जेणेकरून आपल्याला त्या महिन्याचे व्याज देखील मिळेल. पीपीएफमधील गुंतवणुकीसोबतच मॅच्युरिटी रक्कम आणि व्याजही करमुक्त आहे.
सुरक्षित गुंतवणूक आणि दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. PPF खात्यातील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.
जर एखाद्या व्यक्तीने महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली तर त्याला जमा केलेल्या रकमेवर संपूर्ण महिन्यासाठी व्याजाचा लाभ मिळतो. जर ५ तारखेनंतर गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला ५ ते ३० तारखेदरम्यान सर्वात कमी शिल्लक रकमेवरच व्याजाचा लाभ मिळू शकतो.
आपल्या PPF खात्यात ५ एप्रिल २०२५ पूर्वी १.५ लाख रुपये जमा केले, तर त्या महिन्याचे व्याज मोजण्यासाठी संपूर्ण रक्कम विचारात घेतली जाते. जर ७.१% व्याजदरावर आधारित, आपल्याला वार्षिक १०,६५० रुपये व्याज मिळेल.
जर ५ एप्रिलनंतर पैसे जमा केल्यास आपल्याला पहिल्या महिन्याचे व्याज मिळणार नाही. थोडक्यात एप्रिल वगळता आर्थिक वर्षाच्या केवळ ११ महिन्यांसाठी व्याज मिळेल. व्याजदरानुसार गणना केली तर १.५ लाख रुपयांच्या ठेवीवर ९,७६२.५० रुपये होतील.