PF Interest Rate : धक्कादायक… कर्मचाऱ्यांच्या पीएफ रक्कमे संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय! आता PF रक्कमेवर..

PF Interest Rate : सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या GPF खात्यावरील व्याजदर निश्चित करण्याचा किंवा जाहीर करण्याची परवानगी भविष्य निर्वाह निधी संघटनेला करताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटना

भविष्य निर्वाह निधी संघटना त्याचबरोबर अर्थ मंत्रालय आणि कामगार मंत्रालय यांच्यासोबत झालेल्या पत्रव्यवहाराची प्रत \”द इंडियन एक्सप्रेस\” वृत्तपत्रांने माहितीच्या अधिकार अंतर्गत मिळवलेली होती;त्यामध्ये सदरील माहिती उघड झाली आहे.

EPFO चे केंद्रीय विश्वस्त मंडळ कामगार,कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील रकमेवर व्याजदरातील बदल निर्णय घेत असत.अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाशी जुलैच्या प्रारंभी केलेल्या पत्रव्यवहारातून ‘ईपीएफओ’च्या विषयाकडे लक्ष वेधले गेले.

भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेचे देशभरात सहा कोटी सदस्य आहेत.सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी ४४९.३४ कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असताना आता मात्र त्यात १९७.७२ कोटी रुपयांची तूट आल्याने व्याजदर जाहीर करण्याच्या पारंपरिक पद्धतीत बदल करण्यात येत आहे, EPF च्या अधिक व्याजदरांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे अर्थ मंत्रालयाने सुचवले होते.

EPFO Interest Rate updates

अर्थमंत्रालयाने नमूद केले आहे की,बाजारातील प्रचलित व्याज दर आणि EPFO व्याज दर यांच्यातील व्यापक समन्वय सरकारच्या चलनविषयक धोरण प्रसारित करण्याच्या प्रयत्नांना बळ देते.

मागील काही वर्षीपासून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने EPFO च्या अधिक व्याजदरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिणामी एकूण व्याजदर परिस्थितीनुसार 8% पर्यंत कमी करण्याची सूचनाही दिल्याचे समोर आले आहे. भारतात सध्या Senior Citizens Saving Scheme व्याजदर 8.2 % आहे. इतर सर्व लहान बचतींवर ‘ईपीएफओ’ने जाहीर केलेल्या व्याजदरापेक्षा कमी व्याजदर दिला जातो आहे.

PF रक्कमेच्या व्याजदरात मोठा बदल; पहा नवीन व्याजदर

➡️➡️ PF Interest Rates ⬅️⬅️

Leave a Comment

error: Don't Copy!!