Personal Loan : ‘इतका’ CIBIL Score असेल तर; 5 बँका देत आहेत सर्वात स्वस्तात पर्सनल लोन !

Personal Loan : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे निकष असतात.सर्वसाधारण सर्व बँकांचे जर ढोबळ नियम बघितले तर, वैयक्तिक कर्जासाठी आपल्या खात्यात येणारी सॅलरी,त्याचबरोबर आपला सिबिल हा महत्त्वाचा घटक असतो.

सद्यस्थितीत बँकांकडून शॉर्ट टर्म वैयक्तिक कर्ज घेणे फायद्याचे ठरते.आज आपण भारतातील अग्रगण्य बँकांचे वैयक्तिक कर्जावरील व्याजदर जाणून घेणार आहोत ज्या अगदी स्वस्तात कर्जपुरवठा करत आहेत.

Personal Loan Interest Rate

Personal Loan साठी अर्जदार व्यक्तीकडे कर्जासाठी निश्चित स्त्रोत असणे करजेचे असते.साधारपणे किमान 30 हजार रुपयांच्या पगारावरच कर्ज मिळते. निवृत्त व्यक्तींना कर्ज देण्यात बँक दोनदा विचार करते.

पर्सनल लोन घेण्यापूर्वी कर्ज किती काळासाठी घेतले जात आहे हे लक्षात घ्यावे.सहसा या कर्जाचा कालावधी 12 महिने ते 60 महिने इतका असतो. EMI कमी ठेवायचा असल्यास जास्त अवधीसाठीचं कर्ज निवडा.

  • Bank of Maharashtra मध्ये 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर किमान व्याजदर 10.00 % पासून सुरू होतो.
  • Federal Bank ही बँकेत 48 महिन्यांच्या कालावधीसह किमान 11.49 % व्याज दराने 25 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे.
  • Bank of India मध्ये 84 महिन्यांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर किमान 10.25 % व्याजदर आहे.
  • IDFC First Bank कडून 6 ते 60 महिन्यांसाठी 1 कोटी रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जावर किमान व्याज दर 10.49 % आहे.
  • Kotak Mahindra Bank मध्ये 12 ते 60 महिन्यांसाठी किमान 10.99 % व्याज दराने वैयक्तिक कर्ज देत आहे.

CIBIL Score for loan

कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी सिबिल स्कोअर महत्वाचा घटक असतो.बहुतांश सगळ्याच बँकेमध्ये 700 च्या वरती सिबिल स्कोर असल्यास 79 % पर्सनल लोन मिळण्याची शक्यता असते.

त्याचबरोबर यापेक्षा जर कमी सिबिल स्कोर असेल तर, व्याजदर जास्त आकारल्या जातो. आपले थकीत कर्ज वगैरे असेल तर त्याची loan closure प्रमाणपत्र सुद्धा मागवल्या जाऊ शकते.

Persanal Loan Documents

वैयक्तिक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड
  • Income tax (Form No 16)
  • बँक स्टेटमेंट (6 महिने)
  • मागील 3 महिन्याचे पगार पत्रक
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • कर्मचारी ओळखपत्र
कर्ज घेण्यापूर्वी अशी घ्या काळजी

कोणत्याही बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेताना गोष्टींची काळजी घ्यावी लागते.कर्जाच्या कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याआधी त्याच्या अटी व शर्ती यांचे काळजीपूर्वक वाचन करावे.

लोन घेण्यापूर्वी आपल्या परिसरातील ४ ते ५ राष्ट्रीयकृत बँकांच्या व्याजांची तुलना करावी. वैयक्तीक कर्ज घेण्यापूर्वी आपण का घेत आहात हेसुद्धा लक्षात ठेवा.कर्ज तुमची संपूर्ण गरज भागवेल का या प्रश्नाचे उत्तर स्वत:लाच विचारावे.

Leave a Comment

error: Don't Copy!!