PAN Aadhaar linked : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की काय तर लोक आले एक पत्र जारी केले आहे याद्वारे 31 मे 2019 सर्व करदात्यांना त्यांचे पॅनकार्ड (PAN Card) आधारकार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्यास सांगितले आहे. सदरील काम 31 मेपर्यंत पूर्ण न केल्यास ग्राहकांना फटका बसू शकतो.
Pan card and Aadhaar Card Linked
आपण आपले आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक आहे किंवा नाही हे आपण SMS द्वारे तपासू शकता.
इन्कम टॅक्स विभागाच्या सूचनानुसार, भारतात न राहणारे म्हणजेच अनिवासी भारतीय त्यांना पॅन कार्ड लिंक करण्याचीही गरज नाही.मात्र, उर्वरित सर्व करदात्यांना आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक करण्याची आवश्यकता आहे.
मित्रांनो,आयकर विभागाकडून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नाही अशा अनेक भारतीय नागरिकांचे पॅनकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहे. परिणामी आपल्यावर ही वेळ येऊ नये,म्हणून सर्वात प्रथम पॅनकार्ड आधार कार्ड लिंक करून घ्यावे.
Aadhaar Card Pan Card linked Status
- आधार कार्ड पॅनकार्ड लिंक स्टेटस तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- सर्व प्रथम SMS मध्ये UIDPAN टाईप करावे
- स्पेस देऊन 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- त्यानंतर स्पेस देऊन 10 अंकी पॅन क्रमांक लिहावा.
- आपलयाला SMS UIDPAN <12 अंकी आधार क्रमांक> <10 अंकी पॅन खाते क्रमांक> असा दिसेल.
- सर्वात शेवटी SMS 567678 किंवा 56161 वर पाठवावा.
- थोडा वेळाने जर आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक असेल तर आपल्याला आपले पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक झाल्याचा संदेश प्राप्त होईल.
How to link PAN Card and Aadhaar card
असे करा आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करा
- आपल्या मोबाइलवरून UIDPAN (स्पेस) 12 अंकी आधार क्रमांक टाका.
- स्पेस देऊन पॅन क्रमांक टाइप करा.
- आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 567678 किंवा 56161 वर SMS पाठवावा.
- आपले आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक होईल.