Old pension : नमस्कार मित्रांनो,आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केलेली आहे.
सदरील योजनेस संदर्भात नुकतेच नियमावली जाहीर करण्यात आलेली राज्य सरकारने सुद्धा ही UPS लागू करण्याची घोषणा केली आहे.
राज्यातील अधिकाऱ्यांना यूपीएस संदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेले आहेत;तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर..
Old age pension update
वित्त विभागाच्या दि.२०.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तीवेतन योजना (UPS) यामध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाचा एक वेळचा (One Time Option) विकल्प कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांचेकडे सादर करण्याबाबत कळविले आहे.
मित्रांनो,दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाहीत त्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत निवृत्तीवेतन योजना आपोआप लागू राहील, अशी तरतुद सदर शासन निर्णयात आहे.
सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.१ येथे नमूद तरतुदीनुसार संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी विकल्प विभागास सादर करावयाचा आहे.सदरचा विकल्प देण्यास उशिर झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची राहील.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात घेण्यात आलेल्या या निर्णयाची अजून महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. केंद्र सरकार एक एप्रिल 2025 पासून ही योजना लागू करत आहे.
राज्य सरकारकडून संबंधित योजने संदर्भात अजून पर्यंत कोणतीही मार्गदर्शक तत्वे किंवा सूचना प्राप्त झालेल्या नाही. आता सदरील पदराने कर्मचाऱ्यांनी कोणता निर्णय घ्यावा या संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.