Old age pension : खूशखबर ..’या’ कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्तीवेतनात होणार तब्बल 20 ते 50 टक्के पर्यंत वाढ ! शासन निर्णय निर्गमित ..

Old age pension : राज्य शासकीय निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनात दि.०१.०१.२०१९ पासून सुधारित वाढ करण्यात येणार आहे. शासनाने असाही आदेश दिला आहे की, सदर दर दि.०१.०१.२०२४ पासून सुधारित करण्यात येईल.

निवृत्ती वेतनात होणार वाढ!

सदर लाभ केवल दि.०१.०१.२०२४ पासून देय राहील. तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही.

सदरील निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तिवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तिवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती, अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / कोषागार अधिकारी यांच्यावर राहणार आहे.

Pension scheme new chart

  • वय वर्षे ८० ते ८५ – मूळ निवृत्तिवेतनात २०% वाढ
  • वय वर्षे ८५ ते ९० मूळ निवृत्तिवेतनात ३०% वाढ
  • वय वर्ष ९० ते ९५ मूळ निवृत्तिवेतनात ४०% वाढ
  • वय वर्षे ९५ ते १०० मूळ निवृत्तिवेतनात ५०% वाढ
  • वय वर्षे १०० पेक्षा अधिक मूळ निवृत्तिवेतनात १००% वाढ

शासनाने असाही आदेश दिला आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे, अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठे,यांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील.

हे पण वाचा ~  UPS Update : 1 एप्रिल 2025 पासून नवीन 'युनिफाइड पेन्शन योजना' लागू; पहा पात्रता,फायदे आणि NPS आणि OPS मधील फरक ..

कुटूंब निवृत्तीधारकांना पण लाभ

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार याचा वापर करुन शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहतील.

यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तिवेतनधारकांची निवृत्तिवेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

1 thought on “Old age pension : खूशखबर ..’या’ कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती व कुटुंब निवृत्तीवेतनात होणार तब्बल 20 ते 50 टक्के पर्यंत वाढ ! शासन निर्णय निर्गमित ..”

error: Don't Copy!!