NPS Vatsalya Scheme : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 25 च्या अर्थसंकल्पात एक नवीन योजनेची घोषणा केली होती.सदरील योजनेचे नाव होते एम पी एस वात्सल्य योजना. योजेचे पोर्टल १८ सप्टेंबरला लाँच केले आहे. काय आहे ही खास योजना ? पाहूया सविस्तर….
NPS Vatsalya Scheme
मित्रांनो, एमपीएससी वात्सल्य योजनेअंतर्गत आई-वडिलांना त्यांच्या मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्याची संधी मिळणार आहे. आता पालकांना त्यांच्या मुलांच्या खात्यावर बचत करून,मुलांचे भविष्य आर्थिक स्थिरता येण्या संदर्भात गुंतवणूक करता येणार आहे. वात्सल्य योजनेत फ्लेक्सिबल काँट्रीब्युशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना असणार आहे.
मुलांचे भवितव्य होणार सुरक्षित
एनपीएस वात्सल्य योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) च्या अंतर्गत चालवली जाणार आहे.आता दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सगळ्यांना आर्थिक सुरक्षिता मिळावी,यासाठी केंद्र सरकारने ही योजना लॉन्च केलेली आहे.फेब्रुवारीमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदरील गोष्टीची सदरील योजनेची घोषणा करण्यात आली होती.
एनपीएस वात्सल्य योजना
एनपीएस वात्सल्य योजनेत कुणाला गुंतवणूक करता येणार?
एनपीएस वात्सल्य योजना अंतर्गत पालक त्यांच्या खात्यावर पैसे जमा करू शकणार आहे.18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सदरील खाते मुलांच्या नावे हस्तांतरित केले जाणार आहे.18 ते 70 वयोगटातील भारतीय नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
एनपीएस वात्सल्य योजनेचे फायदे
- चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळाल्यानंतर मोठी रक्कम मिळू शकते.
- आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर याशिवाय मुलं निवृत्त होईपर्यंत त्याच्याकडे मोठा निधी जमा होईल.
- लहान वयातच मुलांसाठी गुंतवणूक केल्याने त्यांना दीर्घकालीन आर्थिक नियोजन करता येईल.
- मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर त्याच्या नावे खाते वर्ग करता येईल.
एननपीएस वात्सल्य योजनेची सुरुवात दिल्लीतून केली गेली आहे. मात्र या योजनेच्या लोकार्पणासाठी देशभरात साधारण ७५ ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.