NPS Update : पेन्शन फंड नियामक PFRDA ने नॅशनल पेन्शन स्कीम संदर्भात एक मोठा निर्णय घेतलेला आहे.आता आपल्या खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात काही महत्त्वाचे बदल एक एप्रिल पासून लागू होणार आहेत. तर काय आहे नवीन नियम पाहूया सविस्तर
NPS PRAN New Updates
मित्रांनो एमपीएस सिस्टीम चे व्यवस्थापन करणाऱ्या PFRDA ने नवीन नियमांची माहिती देणारे परिपत्रक जारी केले. आता NPS सदस्यांचे तसेच इतरांतचे हित लक्षात घेऊन, सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (CRA) प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी आता अधिक काळजी घेतली जाणार आहे.
सध्या NPS धारकांना आपल्या खात्यात लॉगिन करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड ची आवश्यकता असते याद्वारे खात्यातील बदल पैसे काढणे शक्य होत असते.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सध्या केंद्र आणि राज्य सरकारचे नोडल अधिकारी सीआरए प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आधारित प्रणालीवर अवलंबून आहेत.आता आपले सुरक्षित करण्यासाठी ते आधार आधारित पडताळणीशी जोडले जाईल.
PFRDA नुसार, आधार आधारित लॉग-इन पडताळणी NPS सदस्याच्या आयडीशी लिंक केले जाईल. शेवटी आधार कार्ड ची लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी प्राप्त झाल्यानंतर आपल्याला ओटीपी इंटर करून आपल्या एनपीएस खात्यात लॉगिन करता येणार आहे.
NPS Withdrawal Rule
तुम्ही NPS खात्यातून पैसे कधी काढू शकता?
- नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये, तुम्ही काही विशिष्ट परिस्थितीत पैसे काढू शकता.
- घर खरेदी करण्यासाठी NPS खात्यातून पैसे काढता येतात.
- मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या लग्नासाठीही खात्यातून पैसे कसा येऊ शकतात.
- NPS खाताधारक किंवा कुटुंबियाच्या वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीतही NPS मधून पार्सल काढू शकता.
- आपल्याला जर नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करणार असेल तर खात्यातून पैसे काढू शकतो
- कौशल्य विकास खर्चासाठी खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.
- एनपीएस धारक कर्मचाऱ्यांचा अपघात झाला असला तर NPS खात्यातून पैसे काढू शकता.