NPS Amount : शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, श्री.शरद गोसावी यांच्याकडून विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद सर्व,अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) सर्व यांना जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी १०० % अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचा-यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम वर्ग करणे संदर्भात सूचना परिपत्रकाद्वारे कळवले आहेत.
NPS Amount Transfer Budget
उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णयानुसार आपणास कळविण्यात येते की, जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी १०० टक्के अनुदानावरील प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अंशदाने, शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदाने यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता मान्यताप्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करणे लेखाशिर्ष ८४४२०२५७ व परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने खाली वर्ग करणे लेखाशिर्ष ८३८२०२७५ तरतूद निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीम्सवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एमपीएस खात्यात रक्कम वर्ग करण्याची शेवटची संधी
सदरचा निधी दिनांक २५.०३.२०२५ पर्यंत १०० टक्के खर्च करण्यात यावा. सन २०२१ या वर्षापासून परिभाषित अशंदान निवृत्तीवेतनाची जमा झालेली रक्कम एनपीएस मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निधी वर्ग करण्याची ही अंतिम संधी असून सर्व डीसीपीएस धारक कर्मचाऱ्यांची रक्कम NPS Account मध्ये वर्ग करण्यात यावी.
जर यानंतर कोणाची रक्कम वर्ग करावयाची राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.अशा शिक्षणाधिकारी यांचेविरूध्द म.ना.से. शिस्त व अपील १९७९ नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.