Nivrutti Vetan : शासकीय कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबांना निवृत्ती अधिनियम १९८२ नुसार निरनिराळ्या प्रकारची पुढील निवृत्तिवेतने देण्यात येतात.
निवृत्तिवेतनाचे प्रकार | Types of Employee’s Pensions
1) नियत वयमान निवृत्तिवेतन
नियम १० च्या संबंधित पोटनियमानुसार ठरविलेले नियत वयमान पूर्ण झाल्यावर सेवानिवृत्त होणान्या शासकीय कर्मचाऱ्याला नियत वयमान निवृत्तिवेतन देण्यात येईल.
2) पूर्णसेवा निवृत्तिवेतन
(१) या नियमांगधील नियम १० च्या किंवा नियम ६५ ते ६७ च्या तरतुदींनुसार, नियत वयमान होण्यापूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या किवा सेवानिवृत्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला पूर्णसेवा निवृत्तिवेतन देण्यात येईल.
ज्या शासकीय कर्मचाऱ्याला, नियम १० च्या पोटनियम (४) आणि (५) च्या तरतुदींनुसार सेवानिवृत्त करण्यात आले असेल अथवा जो सेवानिवृत्त होईल त्याला पूर्णसेवा निवृत्तिवेतन मिळेल.
मात्र, ११ फेब्रुवारी १९६३ रोजी (म्हणजेच नियत वयमान ५५ वरून ५८ पर्यंत वाढविण्यात आल्याच्या तारखेस) सेवेमध्ये असलेल्या शासकीय कर्म- चान्यांच्या वावतीत, निवृत्तिवेतनाची रक्कम ही, नियत वयमान ५८ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले नसते तर, ५५ वर्षे वय झाल्यानंतर “नियत बयनात निवृत्तिवेतन” म्हणून त्यांना जी रक्कम हुक्क म्हणून मिळाली असती त्या रकमेपेक्षा कमी असणार नाही. अशा शासकीय कर्मचा-याच्या वावतीत त्याचे ५५ वर्षे वय झाल्यानंतर त्याने घेतलेले वेतन आणि केलेली सेवा ही अहंताकारी सेवेची व निवृत्तिवेतनार्ह वेतनाची गणना करताना वगळण्यात येईल. म्हणजे पूर्वीचीच जैसे थे परिस्थिती ठेवण्यात येईल.
रुग्णता निवृत्तिवेतन
शासकीय कर्मचारी मानसिक किंवा शारीरिक विकलांगतेमुळे, शासकीय सेवेकरिता किंवा ज्या शासकीय सेवेतील विशिष्ट शाखेत तो काम करोत आहे तेथील कामाकरिता असमर्थ झाला आहे अशा आशयाचे, नियम ७२ मध्ये विहित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र प्रस्तुत केल्यानंतर, ज्या शासकीय कर्मचान्यास नियत त्रयमान होण्यापूर्वी सेवानिवृत्त होण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या शासकीय कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन देण्यात येईल.
विकलांगतेव्यतिरिक्त अन्य कारणासाठी शासकीय सेवेतून कार्यमुक्त केलेला शासकीय कर्मचारी, शासकीय सेवेकरिता तो असमर्थ झाला असल्यासंबंधीचा वैद्यकीय पुरावा प्रस्तुत करू शकत असला तरीही, रुग्णता निवृत्तिवेतनास पात्र असणार नाही.
भरपाई निवृत्तिवेतन
शासकीय कर्मचाऱ्याचे स्थायी पद नाहीसे केल्यामुळे किंवा त्या पदाच्या कर्तव्यांच्य स्वरूपामध्ये बदल झाल्यामुळे कार्यमुक्त करण्यासाठी त्या कर्मचाऱ्याची निवड करण्यात आलेली असेल तर, कार्यमुक्त करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास ज्या पदाच्या शर्ती निदान त्या कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या पदाच्या शर्तीसारख्या वाटतील अशा दुसऱ्या पदावर त्याची नियुक्ती केलेली नसल्यास, त्याला पुढीलपैकी एका विकल्पाची निवड करता येईल.
(ए) त्याने अगोदर केलेल्या सेवेबद्दल त्याला मिळण्याचा हक्क असेल असे कोणतेही भरपाई निवृत्तिवेतन किवा उपदान घेणे, किंवा
(बी) दुसऱ्या एखाद्या आस्थापनेत दुसरी नियुक्ती किवा बदली कमी वेतनावर देखील देऊ केल्यास ती स्वीकारणे आणि आपली पूर्वीची सेवा निवृत्तिवेतनासाठी हिशेबात घेण्याचे चालू ठेवणे.
जखम किवा इजा निवृत्तिवेतन
(१) जखम किंवा इजा निवृत्तिवेतनाकरिता अर्ज मिळाल्यानंतर, अर्जदार कामावर असेल तेथील कार्यालय प्रमुख किवा विभाग प्रमुख, जखम किवा इजा कोणत्या परिस्थितीत झाली यासंबंधीच्या पुराव्यासाठी रीतसर चौकशी करील.
(२) त्यानंतर तो, त्याच्या कार्यालयीन वरिष्ठामार्फत तो अर्ज नमुना २५ मध्ये निवृत्ति- बेतन मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे, त्या प्रकरणातील परिस्थितीसंबंधीच्या निवेदनासह व त्याच्या स्वतःच्या शिफारशींसह सादर करील.
(३) त्यानंतर, विभाग/कार्यालय प्रमुख त्या अर्जदाराची वैद्यकीय मंडळाकडून अथवा नियम ७३ मध्ये निदिष्ट केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासणी करवून घेण्याची व्यवस्था करील आणि ज्या मुद्यांवर वैद्यकीय मंडळाचा अहवाल अपेक्षित असेल त्या मुद्यां संबंधीच्या संपूर्ण निवेदनासह ते प्रकरण अशा मंडळांकडे अथवा प्राधिकाऱ्याकडे पाठवील.
(४) वैद्यकीय मंडळाचा अहवाल मिळाल्यानंतर निवृत्तिवेतन मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास निवृत्तिवेतन मंजूर करावे असे वाटले तर तो अर्ज, लेखापरीक्षा अधिकाऱ्याकडे पाठबील.
अनुकंपा निवृत्तिवेतन
(१) गैरवर्तवणुकीबद्दल किंवा नादारीबद्दल शासकीय रोवेतून काढून टाकलेल्या किवा डेबानिवृत्त होण्यास भाग पाडलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला अनुकंपा निवृत्तिवेतनाबेरीज कोणतेही निवृत्तिवेतन मंजूर केले जाणार नाही.
निवृत्तिवेतनार्ह वेतन
नियम १०६ मधील स्तंभ (२) मध्ये वापरलेल्या “निवृत्तिवेतनार्ह वेतन” या संज्ञेचा अर्थ, सेवेच्या मागील ३६ महिन्यांच्या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्याने अर्जित केलेले सरासरी वेतन, असा आहे. या व्याख्येच्या प्रयोजनार्थ “वेतन” याचा अर्थ खालीलप्रमाणे असून त्यात पुढील वेतनांचा समावेश होतो.
(ए) स्थायी पदावरील कायम पद बेतन. यात स्थायी पदावरील तात्पुरत्या कायम नियुक्तीच्या वेतनाचाही समावेश होतो;
(बी) नियम ९ (४१) मध्ये वर्णन केलेल्या परिस्थितीत दिलेले वैयक्तिक वेतन ;
(सी) ज्या पदाचे कर्तव्य पार पाडले जाते, त्या पदाशी कायमपणे संलग्न असेल तर, नियम ९ (४८) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे विशेष वेतन;
(डी) कायमपणे रिक्त असणाऱ्या स्थायी पदावर किंवा स्वीयेतर सेवेतील कायम पदधारकाच्या अनुपस्थितीमुळे, तात्पुरत्या रिक्त असणाऱ्या कायम पदावर स्थानापन्न नात्याने नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचा-याला मिळणारे स्थानापन्न वेतन.
जर शासकीय कर्मचारी, शेवटच्या ३ वर्षांच्या सेवेच्या कोणत्याही कालावधीत असाधारण रजेव्यतिरिक्त अन्य रजेवर अनुपस्थित असेल किंवा महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी आणि सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियम १० (२) अनुसार पदग्रहण अवधी घेतल्यामुळे अनुपस्थित असेल तर, अशा रजेच्या कालावधीतील किवा पदग्रहण अवधीतील त्याचे वेतन हे, तो रजेच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये किंवा पदग्रहण अवधीमध्ये कोणत्याही वेळी कामावर असता, तर त्याला जे बेतन मिळाले असते ते वेतन.
मृत्यू-नि-सेवा निवृत्ति उपदान आणि कुटुंब निवृत्तिवेतन
(१) नियम १०४ (बी) मधील तरतुदींचा विकल्प देणारा शासकीय कर्मचारी, यथास्थिति नियम १११ अनुसार अनुज्ञेय असणारे मृत्यू-नि-सेवानिवृत्ति उपदान किंवा नियम ११६ किंवा ११७ अनुसार अनुज्ञेय असणारे कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र होईल.
(२) नियम १०६ अनुसार अनुज्ञेय असणारे निवृत्तिवेतन हे, शासकीय कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीच्या वेळी लागू असलेल्या, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८१ मध्ये विहित केलेल्या अंशराशीकरण तक्त्यानुसार गणना केलेल्या उपदानाच्या निवृत्तिवेतन सममूल्याने कमी करण्यात येईल.
(३) अकार्यक्षमतेच्या कारणावरून शासकीय सेवेतून काढून टाकलेल्या किंवा सेवानिवृत्त होण्यास भाग पाडलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला, जर तो नियत बथमान किया पूर्णरोवा निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र ठरत असेल तर, ते निवृत्तिवेतन मंजूर केले जाईल. जर तो नियत बयमान किंवा पूर्णसेवा निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र ठरत नसल तर त्याला अनुकंपा निवृत्तिवेतनाखेरीज इतर कोणतेही निवृत्तिवेतन मंजूर केले जाणार नाही.
Eps 95 an amount of ₹2195/- even after 34 years of service after appointment.
1)सेवानिवृत्ती वेतन मिळण्याकरिता किती वर्षाची सेवा होणे आवश्यक आहे?
2) सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे मृत्यू झाल्यावर दोन बायकांना समान कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी काय नियम आहे? कृपा करून कळवावे
20 वर्ष सेवा, सर्व्हिस बुक नोंद असल्यास दोन्हीला मिळते.